Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिंतामणी : चित्रपट परीक्षण

Webdunia
शुक्रवार, 31 ऑक्टोबर 2014 (15:35 IST)
चित्रपट : चिंतामणी
दिग्दर्शक :  कल्पना सेट्टी, संगीता बालचंद्रन, प्रणव विनोद पाठक
सिनेनिर्मिती : संगीता बालचंद्रन
स्टुडिओ : सत्या व्हिजन अचिव्हर्स स्पेक्ट्रम फिल्म्स
कलाकार : भारत जाधव, अमृता सुभाष, तेजश्री वालावलकर, रुचिता जाधव उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के, मोनिका दवडे. 
कथा :  दीपक अनंत भावे 
 
‘चिंतामणी’ चित्रपटाची कथा ही एका मध्यमवर्गीय माणसाच्या असामान्य कर्तृत्वाची आहे. मुंबईच्या चाळीत आपल्या बायको आणि मुली सोबत राहणारा चिंतामणी आपल्या घरचांच्या आणि स्वतःच्या छोटय़ा-मोठय़ा गरजा परिस्थितीमुळे भागवू शकत नसल्यामुळे त्याला होणार्‍या वेदनांची ही कथा आहे. 
 
श्रीमंत माहेर असलेली प्रेमविवाह करून आणलेली बायको, सासर्‍यांच्या मते कुचकामी ठरलेला तिचा पती चिंतामणी. आपले बाबाही सुपरहिरो असावेत अशी माफक इच्छा असलेली १० वर्षाची मुलगी. त्यांच्या अपेक्षेला चिंतामणी कधीच उतरलेला नसतो. मध्यमवर्गीय वृत्ती आणि पैसा आड येतो. इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात पण त्यासाठी धमक लागते पण तीदेखील या चिंतामणीत नाही. ‘आल अंगावर घेतलं शिंगावर’  खरय अगदी अशीच गोष्ट चिंतामणीच्या आयुष्यात घडते. वर्तमानपत्र आणि अनेक इतर माध्यमातून आज विविध प्रकारच्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या आपण आवर्जून वाचतो ही. परंतु, एक जाहिरात तुमचे आयुष्य बदलू शकते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘चिंतामणी’ हा चित्रपट पहावा लागेल. 
टिकट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा
चित्रपटात भरत जाधव, अमृता सुभाष, रुचिता जाधव आणि बालकलाकार तेजश्री वालावलकर यांच्या मुख्य भूमिका असून उदय टिकेकर, हेमांगी राव, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, जयराज नायर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, माधव देवचक्के आणि मोनिका दबडे यांच्याही भूमिका आहेत. कथा दीपक अनंत भावे यांची असून पटकथा आणि संवाद किरण श्रीनिवास कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी लिहिले आहेत. यात तीन वेगळ्या बाजाची गाणी असून ही गाणी अरविंद जगताप, सागर खेडेकर आणि संजीव कोहली यांनी लिहिली असून या  तिन्ही गाण्यांना संजीव कोहली यांनीच संगीत दिले आहे. सुरेश सुवर्णा यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.

रेटिंग : 3/5

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments