Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्रपट समीक्षा : डोंबिवली रिटर्न

Webdunia
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (16:13 IST)
जगण्यासाठी काय आवश्यक असतं, पैसा की नीतिमत्ता? प्रत्यक्षात या दोन्हीची समप्रमाणात आवश्यकता असते. या दोन्हीचा समतोल साधला गेला की आयुष्य सुखा-समधानाने शांतपणे जगता येतं. अर्थात केवळ नीतिमत्ता असेल आणि पैसा नसेल, तर रडतखडत का होईना पण जगता येतं. परंतु केवळ पैसा असेल आणि नीतिमत्ता नसेल, तर मात्र जगण्याची जी काही वाताहत किंवा परवड होते तिला तोड नसते. जो 'डोंबिवली रिटर्न'मधील अनंत वेलणकरचा होतो.
 
खरंतर अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) म्हणजे एकदम पापभिरु माणूस. मूळचा विदर्भातला पण, आता डोंबिवलीला बायको (राजेश्र्वरी सचदेव), मुलगी आणि भावाबरोबर (अमोल पराशर) राहाणारा. नोकरीला मंत्रालयात जनसंपर्क विभागात. मात्र मंत्रालयात काम करूनही वरकमाईची कसलीही अपेक्षा न ठेवणारा आणि कुणी द्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यापासून चार हात लांब पळणारा. एकूण अनंत वेलणकर म्हणजे नीतिमत्तेचा सगुण-साकार पुतळा, आहे त्यात समाधान मानून जगणारा, कुटुंबसुख पुरेपूर उपभोगणारा. मात्र एक दिवस त्याच्या हाताला अचानक एक पुरावा लागतो. राजकारणात दबदबा असलेल्या दादासाहेबांनी कुणा एकाची हत्या घडवून आणल्याचा. वास्तविक दादासाहेब अनंतचे आवडते नेते. त्याची त्यांच्यावर अतीव श्रद्धा. त्यामुळेच तो आपल्याकडील पुरावा दादासाहेबांना नेऊन देतो. त्याबदल्यात दादासाहेब त्याला भरपूर पैसे, मुंबईत घर... असं बरंच काही देऊ करतात. परंतु पापभिरू आणि सच्छील असलेला अनंत वेलणकर सगळ्याला नकार देतो. पण हा नकारच त्याला भारी पडतो. कारण नीतिवान माणूसच कुण्याही राजकारण्यासोरचीसगळ्यात मोठी समस्या असतो. साहजिक दादासाहेब आपल्या माणसांकरवी असं काही मायाजाल विणत जातात की अनंत त्यात अडकत तर जातोच, परंतु पैशांपासून चार हात लांब असलेला अनंत पैशांच्या मागे लागतो आणि त्यात त्याचं स्वतःचं स्वास्थ्य तर हरवतंच, वर कौटुंबिक सुखालाही तो दुरावतो. अनंतच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, तो होत्याचा नव्हता होतो. आयुष्यात पैसा नसताना सुखात जगणार्‍या अनंताचं, आप पैसा आल्यावर नेमकं काय होतं, ते कळायला हवं असेल तर हा सिनेमा पाहाण्याशिवाय गत्यंतर नाही.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments