Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनयाची सराफी श्रीमंती

मनोज पोलादे
अशोक सराफ यांच्या अभिनयाविषयी बोलताना अष्टपैलू या विशेषणाचा आधार घेतल्याशिवाय चालणारच नाही. त्यांच्या भूमिकांचा कॅनव्हास विनोदी, गंभीर अगदी खलनायकीच्या थाटाच्या भूमिकांपर्यंत विस्तृत आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ संपल्यानंतर ज्यांनी या चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला अशा मोजक्या अभिनेत्यांत अशोक सराफ यांचे नाव घ्यावे लागेल.

विनोदी भूमिकांत हशा पिकवणे आणि खलनायकी भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात चीड निर्माण करणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. पण या दोन्हीद्वारे सराफ यांनी आपल्या अभिनयाची श्रीमंती दाखवून दिली आहे. सराफ त्यांच्या बिनधास्त वावराने संपूर्ण पडदा व्यापून टाकतात.

अर्थात हे करण्यासाठी त्यांना उपगोयी पडली ती मराठी नाटकांची पार्श्वभूमी. विजया मेहता यांच्या कडक शिस्तीखाली हमीदाबाईची कोठी करताना त्यांच्या अभिनयाचा खरा कस लागला. सहाजिकच हीच शिस्त त्यांना पडद्यावर काम करताना खूप उपयोगी पडली, हे ते कृतज्ञनेते मान्य करतात.

एकेकाळी विनोदी भूमिकांमुळे अशोक सराफ म्हणजे हमखास मनोरंजन हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात घट्ट बसले होते. मात्र, त्यानंतरही वैविध्यपूर्ण भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कक्षा किती विस्तृत आहेत याचे दर्शन घडविले. दोन्ही घरचा पाहूणा द्वारे १९७१ मध्ये सुरू झालेला सराफ यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवास यंदाच्या अनोळखी हे घर माझ या चित्रपटापर्यंत सुरूच आहे.

दादा कोंडकेंच्या चित्रपटात सबकुछ दादा असताना आपले अस्तित्व टिकवणे अनेकांना शक्य झाले नाही. अपवाद अशोक सराफ यांचा. पांडू हवालदारमध्ये थेट दादांशी अभिनयाची जुगलबंदी करताना आपला ठसा उमटवला. ऐंशीच्या दशकात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरश: धुमाकूळ घातला.

यात अनेकदा सराफांना अभिनयाला आव्हान देणाऱया भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे ते एका चौकटीत अडकतात की काय असे वाटत होते. मात्र, त्यातही त्यांनी कळत नकळत, भस्म्या यासारख्या चित्रपटाद्वारे वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या सशक्त अभिनयासाठी उज्जव ठेंगडी दिग्दर्शित 'वजीर' पहायला हवा. राजकारण्यांची देहबोली त्यांनी अगदी हुबेहुब साकारली आहे.

' एक डाव भुताचा'मधील भूत अप्रतिम. सराफांची जोडी चांगली जमली ती सचिन पिळगावकर यांच्यासोबत. या जोडीने अनेक चित्रपट केले. आमच्यासारखे आम्हीच, नवरी मिळे नवऱयाला, गंम त जंमत नुकताच आलेला नवरा माझा नवसाचा हे काही चित्रपट. शिवाय महेश कोठारे या मराठीतील हिट दिग्दर्शकासमवेत धुमधडाका, नुकताच आलेला 'शुभमंगल सावधान' हे चित्रपटही केले.

हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केले. पण मराठीच्या या सुपरस्टारने हिंदीत बिनमहत्त्वाची भूमिका करण्यापेक्षा मराठीतील सुपरस्टार रहाणेच पसंत केले. त्यामुळे हिंदीत त्यांचे चित्रपट कमी असले तरी केवळ ते अशोक सराफ आहेत, म्हणूनही लक्षात रहातात. दूरचित्रवाणीद्वारे त्यांनी हम पाँच या एकेकाली लोकप्रिय ठरलेल्या मालिकेत काम केले.


अशोकने आपल्या अभिनयाचे रंग भरलेले चित्रपट-

मराठी-

वजीर
चिमनरांव गुंड्याभाऊ
अबोध
छक्के पंज्जे
धरले दर चावते
आमच्या सारखे आम्हीच
चौकट राजा
धुमधडाका
नवरी मिळे नवरयाला
आपली माणसं
आयत्या घरात घरोबा


हिंद ी-

करण अर्जून
कोयला
सरफिरा
प्रेम दिवाने
जाग्रृती
कोहरा

नाटक-

अनधिकृत
मनोमिलन
हमीदाबाईची कोटी
सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

Maha Kumbh 2025 त्रिवेणी संगमाजवळ भेट देण्यासाठी ही 3 ठिकाणे, महाकुंभाच्या वेळी नक्कीच बघा

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

पुष्पा 2 च्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक,व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले

लापता लेडीज ऑस्करमधून बाहेर, चाहते संतापले दिल्या प्रतिक्रया

Show comments