Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गावरान अभिनेता

मनोज पोलादे
मकरंद अनासपुरे म्हणजे अस्सल गावरान गडी. गावच्या मातीचा लहेजा त्याच्या भाषेत उतरलाय. आणि त्याचवेळी त्या मातीतली नैसर्गिकता त्याच्या अभिनयात उतरलीय. म्हणूनच पडद्यावर कलावंत म्हणून वावरताना त्यातली सहजता लक्ष वेधून घेते.

मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या मकरंद उर्फ मक्याला ( त्याचे टोपणनाव) यशस्वी होण्यासाठी अतिशय संघर्ष करावा लागला. शाळेत असताना नाटक, एकांकिकांत अभिनय करणारया मकरंदने नंतर नाट्यशास्त्राचीच पदवी. घेतली. त्यानंतर अनेकांच्या सल्लावरून तो करीयरसाठी मुंबईत आला.

नाना पाटेकरांनी त्याला मुंबईत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण काम मिळवण्याचा आणि त्यानंतर यशस्वी होण्याचा रस्ता एवढा सोपा नव्हता. नाटकात छोट्या मोठ्या भूमिका करून कसेबसे तो या क्षेत्रा टिकून राहिला. झालं एकदाचं, टूरटूर ही त्याची सुरवातीची नाटके. नंतर नाना पाटेकरांच्या मदतीने त्याला यशवंत आणि वजूद चित्रपटात छोट्या भूमिका मिळाल्या.

पण त्याची ओळख सर्वत्र होईल, अशी भूमिका त्याला तोपर्यंत मिळत नव्हती. मात्र, याच काळात सुरू झालेल्या मराठी वाहिन्या त्याच्या पथ्यावर पडल्या. कोंडमारा, शकून अपशकुन, मावशी नंबर वन, बेधुंद मनाच्या लहरी यासारख्या मालिका हीट झाल्या नि मकरंदला ओळख मिळू लागली. त्याचे खरे नाव झाले ते इ टीव्ही वरच्या दी एंडचा शेवट या मालिकेने.

त्याच्या गावरान निवेदनाला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. निवेदनाची ही 'ष्टाइल' लोकांना आवडली. मग ती त्याचा ब्रॅंड बनून गेली. टिकल ते पोलिटिकल या मालिकेतून लोकांचे लक्ष वेधून घेतले. राजकीय घडामोडींवर 'कॉमेंट' करणारी ही मालिका लोकांना खूप आवडली. त्यानंतर श्रावणी देवधरांनी त्याला 'सरकारनामा' या चित्रपटात त्याला संधी दिली.

तेथे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. नंतर 'सातच्या आत घरात' मध्येही याच ढंगाची त्याची भूमिका गाजली. या चित्रपटातील त्याचा ' काय राव' हा डायलॉग भलताच गाजला. त्यानंतर मग 'काय द्याच बोला' हा त्याला नायक म्हणून ओळख देणारा चित्रपट आला. या चित्रपटाने त्याला नायक म्हणून सुस्थापित केले.

' गाढवाचं लगीन', 'बघ हात दाखवून', नाथा पुरे हे त्याचे इतर चित्रपट. मकरंदची अभिनय शैली एकदम हटके आहे. त्याची चेहरयावरील हावभाव, ग्रामीणं ढंगातील बोलणं म्हणजे 'लई भारी'. त्याच्यामुळे माणूसं आपल्या ग्रामीण परंपरेशी स्वत:ला कुठेतरी 'रिलेट' करतो.

मकरंदने शहर व ग्रामीण भागातील 'गॅप' भरून काढली असे म्हणता येईल. त्याच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक कसदार अभिनेता मिळाला. भविष्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


मकरंद अनासपुरेचे काही चित्रप ट-


खबरदार

नवसांचं पोर

सरकारनामा

काय द्याचं बोल ा

बघ हात दाखवून!

शुभमंगल सावधान ं,

काळूबाईच्या नावानं चांगभलं


मालिका-

कोंडमारा

तू तू मै मै

सी. आय. डी.

सूनं सूनं आभाळ

बेधुंद मनाच्या लहरी

टिकलं ते पोली‍टिकलं

नाटक-

टूरटूर
झालं एकदाचं
सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

Saif Ali Khan वरील प्राणघातक हल्ल्याचे संपूर्ण सत्य बाहेर आले, पाठीचा कणा आणि मानेला दुखापत

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, लीलावती रुग्णालयात दाखल

भृशुंड गणेश भंडारा

अक्षय कुमारने 'भूत बांगला'च्या सेटवर तब्बूचे केले स्वागत, 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी दिसणार एकत्र

अमर सागर सरोवर राजस्थान

Show comments