Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्टफोनच्या विळख्यात बालपण

Webdunia
स्मार्टफोनवर सध्या कँडीक्रशनंतर स्पीड रेसिंग, अँग्री बर्ड, टेम्पल रन, स्नेक, रेस, बर्न इट आऊट, ड्रॉप लीट्ज डिलाईट, बर्न द रोप, बॉम्ब टॉस, ब्लॉक ब्रेकर्स, क्रिकेट वर्ल्ड, फुटबॉल, सॉकर, तीनपत्ती अशा गेम्सची चलती आहे. या खेळांनी मैदानी खेळांना मागे टाकले आहे. त्यांच्या ट्रीक्स आणि स्कोअर करण्याच्या नादात मार्कसीटवरील स्कोअर मात्र हुकत आहे.
 
सर्वच सोशल मीडियावर गेमिंगचे फॅड वाढत आहे. महागडा मोबाईल घेतल्याने गेम खेळणे, चॅटिंग करणे, गुगल सर्चचा वापर करणे असे नाना प्रकार बालसुलभ वयात होत आहेत. स्मार्ट पिढी म्हणून पुरवण्यात येणार्‍या या चोचल्यांचे दुष्परिणामही आहेत. क्रीडा आणि मानसशास्त्रज्ञांशी याविषयी चर्चा केली असता त्यांनी हा प्रकार गंभीर असल्याचा इशारा दिला. लहान मुलांच्या हाती असलेले हे गॅझेट घातकच आहे. त्यामुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. लवकर उत्तेजित होणे, राग येणे, भावना अनावर होणे, चिडचिड वाढणे, मन एकाग्र न होणे अशा समस्यांचा सामना नव्या पिढीला करावा लागत आहे. इंटरनेट पॅकमुळे स्मार्टफोनचा खरा उपयोग होतो. नेटवर गेमचे मायाजाल पसरले आहेत. करमणूक करण्यापासून ते हिंसक वळणावर सोडणारे आणि अश्लीलतेचा भडिमार असलेले अनेक गेम्स आपल्या लहान मुलांचे भावविश्‍व कोमेजून टाकत आहेत. त्यांना हिंसक वळणावर आणण्याचे हे खेळणे सोयीस्कर वाटत असले तरी तासन्तास गेम्स खेळल्यामुळे मुलांच्या मानसिकतेत बदल होत असल्याचा इशारा मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे. 
 
एकीकडे खेळांची मैदाने संपत असताना आता उरलेल्या मैदानांवर तरी मुले येतात का? अशी ओरड होत आहे. मुलांअभावी मैदानेच ओस पडत आहेत. उलट मोबाईलवर खेळणारी मुले सहज दिसतात. स्मार्टफोनने सध्याच्या टेक्नोसॅव्ही पिढीला विळखा घातला आहे. हातातील या छोट्या खेळण्यामुळे खेळच ओलीस आला आहे. कधीकाळी मैदाने मुलांनी फुलून गेलेली असायची, आता ती स्मार्टफोनच्या गेमिंगमध्ये गुंग झाली आहेत. या गेमाडपंथी मार्गाने पालकांच्या खिशाला कात्री लागली असून अभ्यासालाही बुट्टी बसत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.
 
लहान वयातच विळखा
 
आई-बाबा, दादा, ताई यांच्याकडील स्मार्टफोनवर सध्या लहान मुलांचा डोळा असतो. ऑफिसला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर मोबाईलवर बच्चे कंपनीची बारीक नजर असते. मोबाईलची इत्यंभूत माहिती लहान मुलांना आहे, त्यामुळे कोणत्या फोल्डरमध्ये काय आहे, याची माहिती मुलांना असते. त्यात एखाद्या दिवशी मोबाईल हाताळायला मिळाला नाही की, मुलांची चिडचिड वाढते. मोबाईल गेमचे हे वेड अभ्यासावरही परिणाम करणारे ठरते. मोबाईलचा हट्ट पुरवण्यासाठी रडण्याचे, लोळण घेण्याचे प्रकार सर्रासपणे केले जातात. त्यामुळे या इमोशनल ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक पालक मोबाईल देऊन मोकळे होतात. मात्र ही कृती भविष्यातील संकटांना आमंत्रण देणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे.
 

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा