Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉलोविन: भुताटकी सण

हॉलोविन: भुताटकी सण
हॉलोविन हा सण युरोपियन देशांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हिंदू धर्मात जसं पितृपक्ष असतो तसेच तेथील पितरांसाठी हॅलोवीन सण साजरा करण्याची पद्धत आहे. अधिक धार्मिक वळण न देता भुताटकी आनंदी सण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात आयरलँड आणि स्कॉटलँड येथून झाली आहे. हा सण सल्टिक जातीचे लोकं नववर्षाची पूर्व संध्या म्हणून साजरा करतात. 
 
खरं म्हणजे हा सण भोपळ्याचा सण म्हणावा. या मोसमात सर्वीकडे लहान-मोठे भोपळे दिसू लागतात. येथील लोकं या दिवशी मुलांना भोपळ्याच्या आकाराची कँडीज भेटा म्हणून देतात. तसेच या दिवशी जॅक-ओ-लँटर्न तयार केले जातं. ज्यात पोकळ्या भोपळ्यात डोळे, नाक आणि चेहर्‍याची नकाशी केली जात असून आत मेणबत्ती जाळतात. नंतर हे भोपळे दफन करतात.
 
या देशांप्रमाणे मृत आत्मा या दिवशी सांसारिक प्राण्यांशी साक्षात्कार करतात ज्याला सॅमहॅन असेही म्हणतात. हा दिवस पीकासाठी मोसमच शेवटला दिवस असतो आणि यानंतर हिवाळा सुरू होतं. या दिवशी मृत लोकांची आत्मा पृथ्वीवर येते आणि काही आत्मा जिवंत लोकांना त्रास देऊ पाहतात म्हणून वाईट आत्म्यांपासून बचावासाठी लोकं भुताटकी वेशभूषा करतात. कॅम्प फायर करुन त्यात मृत जनावरांचे हाड फेकतात. आणि त्याच्या आजूबाजू नृत्य करतात.
 
सुमारे 2000 वर्षांपूर्वी आल सेट्स डे संपूर्ण उत्तरीय युरोपीय देशांमध्ये 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. यापूर्वी आल हॅलोस इव्ह अर्थात पूर्व संध्याकाळ म्हणजेच हॅलोवीन इव्ह या नावाने ओळखले जाते.
 
या सणावर बर्मब्रॅक, बॉनफायर टॉफी, कँडी अप्पल, मंकी नट्स, कॅरामेल अप्पल्स, हॉलोविन केक, तसेच वटवाघुळ आणि किड्यांच्या आकाराची कँडीज, पाय, ब्रेड, पॉपकॉर्न, केक असे व्यंजन तयार करण्यात येते. एकूण पितरांची आठवण म्हणून हा सण भुताटकी प्रकारे आनंदाने साजरा करण्यात येतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्भावस्थेत शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे