Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगभरातील श्रीमंत राजघराणी

Rich dynasties worldwide
Webdunia
राजा-राणीच्या कथा या नेहमीच खूप वर्षांपूर्वी अशी सुरूवात करूनच असतात असे नाही. या एकविसाव्या शतकातही अनेक देशांमध्ये अगदी विकसित देशातही राजा-राणी आहेत. काही राजघराणी तर शेकडो वर्षांपासून संबंधित देशांमध्ये राज्य करीत आहेत. काहींना आजही अमर्याद अधिकार आहेत तर काही नाममात्र सत्ताधीश आहेत. अशाच काही श्रीमंत आणि वर्षानुवर्षे राज्य करीत असलेल्या राजघराण्यांची माहिती...
 
 
इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय फेब्रवारी 1952 पासून राजसिंहसनावर आहे. त्यांची संपत्ती 650 दशलक्ष डॉलर्सची आहे.

* भूतानच्या तरूण राजाचे नाव आहे जिग्मे खेसर नमग्येल. डिसेंबर 2006 मध्ये या राजाने आपल्या वडिलांकडून राज्याची सूत्रे हाती घेतली होती. हे राजघराणेही अतिशय श्रीमंत आहे.
* थायलंडचे दिवंगत राजे भूमीबोल हयात असताना ते जगातील सर्वाधिक काळ राजसिंहासनावर राहिलेले व्यक्ती ठरले होते. आता त्यांच्या पश्चात म्हणजे गेल्या वर्षीपासून महा वहाइलाँगकॉर्न राजे बनले आहेत.
 
* संयुक्त अरब अमिरातीचे राजे खलिफा बिन झायेद खान नहयान नोव्हेंबर 2004 पासून सत्ते आहेत. त्यांची संपत्ती 23 अब्ज डॉलर्सची आहे.

* जॉर्डनची राणी रनिया ही जगभरात चर्चेत असते. जॉडनचे राजे अब्दुल्लाह दुसरे फेब्रवारी 1999 पासून सत्तेवर आहेत. त्यांची संपत्ती 750 अब्ज डॉलर्सची आहे.
* ब्रुनेईच्या सुल्तनाची संपत्ती आणि त्याची महागडी जीवनशैली जगभरात चर्चेत असते. ऑक्टोबर 1967 पासून हा सुल्तान सत्ताधीश आहे. त्याची संपत्ती वीस अब्ज डॉलर्सची आहे.
 
* सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलाजीज अल सौद जानेवारी 2015 मध्ये राजे बनले. त्यांची महागडी सहल सध्या चर्चेत आहे. त्यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर्सची आहे.

* स्वाझिलँडचा राजा मस्वाती तिसरा एप्रिल 1986 पासून राजसिंहसनावर आहे. त्याची संपत्ती 200 अब्ज डॉलर्सची आहे. अनेक विवाहांबाबतही हा राजा जगभरात ओळखला जातो.

* बहरिनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा 2002 पासून सत्तेत आहेत. त्यांची संपत्ती 3.5 अब्ज डॉलर्सची आहे. त्यांच्या शानोशौकतचीही चर्चा असते.
 
* मोरोक्कोचे राजे मोहम्मद सहावे जुलै 1999 पासून सिंहासनावर आहेत. त्यांची संपत्ती दीड अब्ज डॉलर्स इतकी आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

सुंदर त्वचेसाठी नारळ तेल सर्वोत्तम आहे, त्याचे 5 फायदे जाणून घ्या

चविष्ट आणि आरोग्याला फायदेशीर राजगिरा शिरा रेसिपी

घरात ठेवलेल्या या 3 इलेक्ट्रिक वस्तूंमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, त्या ताबडतोब काढून टाका

डोक्यावर मेंदी लावण्याचे 5 सौंदर्यवर्धक फायदे जाणून घ्या

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत फक्त दोन लवंगा खा, तुमचे आरोग्य सुधारेल

पुढील लेख
Show comments