Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अधिक मासात काय दान कराल?

Webdunia
ND
सर्वांत उत्तम महिना म्हणून अधिक महिन्याची गणना होते. या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत, तरीही धार्मिक कर्मकांडांसाठी मात्र हा महिना उत्तम मानला जातो. हा महिना पंधरा एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे.

अधिक महिना धार्मिक वा अध्यात्मिक हेतूंच्या प्राप्तीला सहाय्यकारक महिना मानला जातो. संसारचक्रात अडकलेल्या सामान्यजनांना एरवी परमेश्वर व अंतिमत- मोक्ष प्राप्तीसाठी काही करावे याची जाणीव रहातेच असे नाही. परंतु, अधिक महिना हा चार वर्षांत एकदा येत असल्याने या महिन्यात ही जाणीव होऊन काही धर्मकृत्ये करण्याची मनाची तयारी होते.

भारतीय ज्योतिषात अधिक मासाला 'तेरावा महिना' म्हटले आहे. सूर्य बारा राशीत वर्षभर भ्रमण करत असतो. ३२ महिने, १६ दिवस व चार घटकांनंतर सूर्याला कोणतीही संक्रांत नसते. ज्या महिन्यात सूर्याची संक्रांत नसते, तो अधिक महिना मानला जातो.

अधिक महिना असलेले वर्ष ३९६ दिवासांचे असते. इतर वर्षांत ३६५ दिवस ५ तास, ४५ मिनिट व १२ सेकंद असतात.

या महिन्यात दानाचे विशेष महत्त्व आहे. तिथीनुसार दान केल्यास बरेच पुण्य पदरात पडते.

कोणत्या तिथीला काय दान करावे?

- प्रतिपदेला चांदीच्या पात्रात तूप
- द्वितीयेला कास्य पात्रात सोने
- तृतीयेला चणे किंवा चण्याची डाळ
- चतुर्थीला खारीक
- पंचमीला गूळ व तुरीची डाळ
- षष्ठीला अष्टगंध
- सप्तमीला रक्तचंदन
- नवमीला केशर
- दशमीला कस्तुरी
- एकादशीला गाय
- द्वादशीला शंख
- त्रयोदशीला घंटा
- चतुर्दशीला मोती
- पौर्णिमेला माणिक रत्न

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

दशरथ कृत शनि स्तोत्र

शनिवारची आरती

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

शनि साडेसाती चिंतन कथा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

Show comments