जन्मपत्रिकेच्या मदतीने चालू जीवनातील नियतीला आपण जाणून घेऊ शकतो. जे नशिबात आहे ते बदलता येत नाही पण माणूस आपल्या काय घडणार आहे, हे जाणून घेऊन त्यात सुधारणा करू शकतो. संचितापेक्षा चालू कर्म श्रेष्ठ असतील तर माणसाचे भाग्य बदलू शकते. म्हणून चालू वर्तमान जीवनात चांगले काम करण्यासाठी आणि जीवन कर्मांचे चांगले फळ मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्र आवश्यक आहे.
जन्म-नक्षत्र, राशी, जन्म-पत्रिका व त्यांचे योग याचे विश्लेषण करून व्यक्तीचा स्वभाव, प्रकृती, रंग व चांगल्या वाईट वेळेबरोबर भूत, भविष्य, वर्तमान यांना जाणून घेता येते. त्याच्या मदतीने आपण जमिनीवर दिशेची निवड, मुख्य चौकट बसवणे, रंगाची निवड, घराची बांधणी, गृहप्रवेश या गोष्टी ठरवू शकतो. वास्तुशास्त्राचे सिद्धांच आणि नियमानुसार बांधणी आणि त्याचे परिणाम यासाठी जन्मपत्रिकेचे विश्लेषण आवश्यक आहे.
WD
जन्मपत्रिका बनवणे :- जन्मपत्रिका तयार करणे गणिती काम आहे. ही माहिती ज्योतिष्याचा कोणत्याही पुस्तकात मिळते. म्हणून या गोष्टीचे विश्लेषण येथे केलेले नाही. हल्ली कॉम्प्युटरवर सोप्या पद्धतीने जन्मकुंडली तयार केली जाते. कॉम्प्युटर वर योग्य पंचांगांच्या मदतीने सॉफ्टवेअर बनवले असेल तर योग्य जन्मवेळ, जन्म तारीख, जन्म ठिकाण दिले गेले तर पत्रिकेत त्रुटींची शक्यता कमी होते.
जन्मपत्रिकेचा व ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्राचा परस्परसंबंध आहे. व्यक्तीचे नाव, जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण यांच्या मदतीने पत्रिका बनवली जाते. यात जातकाच्या नावापासून आशय जातकाचे कुटुंब, वर्ण, संस्कार आणि वर्णानुसार आई-वडिलांच्या व्यवसायाशीही संबंध देतात. जन्मवेळ आणि जन्मतारखेत संपूर्ण कालचक्र म्हणजेच ज्योतिषाचा समावेश होतो. जातकाच्या जन्म ठिकाणापासून आशय जातकाचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला आहे तो किती अक्षांशावर राहतो ही सर्व माहिती वास्तुशास्त्रातील आहे.