Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमच्या पत्रिकेत शनि दोष आहे काय?

वेबदुनिया
शनि ग्रह एका घरातून दुसर्‍या घरात जातो तेव्हा लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होत असते. शनिची आपल्यावर वक्र
दृष्‍टी असल्यास काही तरी विपरीत घडते. बसलेली घडी विस्कटते, अशी समजूत आहे. शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे. ते जाणून घेण्यासाठी खालील कसोट्या पाहा.

- आपल्याला नेहमी थकवा येत असेल तर...

- अंघोळ करण्याची इच्छा होत नसेल तर..

- नवीन कपडे खरेदी केले आहेत परंतु ते परिधान करण्यासाठी संधी मिळत नसेल तर...

- घरात तेल, दाळींचे नेहमी नुकसान होत असेल तर...

- अन्नावरील वासना उडाली असेल तर...

- डोक्यापासून कमरेपर्यंत प्रचंड वेदना होत असतील तर...

- वडिल आणि मोठ्या भावासोबत वारंवार खटके उडत असतील तर...

- अभ्यासात मन लागत नसेल तर...

आपल्याला वरील लक्षणे जाणवत असल्यास आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे, असे समजावे.

शनि दोष दूर करण्यासाठी उपाय:

- तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.

- पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा.

- हनुमान व सूर्याची आराधना करावी.

- मांस- मद्य यांचे सेवन करू नये.

- दीन दुबळ्यांना मदत करावी.

- काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

Show comments