Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वर्ष 2019 : नवीन वर्षात 12 राशींसाठी 12 उपाय

12 राशी
मेष- शनीसाठी तेलात सावली बघून दान करावे. केतूसाठी काळ्या कुत्र्याला तेला लावलेली पोळी खाऊ घालावी. गणेश आराधना करावी. अमावस्येला पितरांनिमित्त भोजन करवावे.
 
वृषभ- हनुमान मंदिरात बसून नित्य हनुमान चालीसा पाठ करावा. सूर्याला अर्घ्य द्यावे. वृद्धांची सेवा करून त्यांच्या आशीर्वाद मिळवावा. महादेवाच्या मंदिरात दूध-मिश्रित जल अर्पित करावे.
 
मिथुन- महादेवाला अभिषेक करावा. 'ॐ नम: शिवाय' मंत्राचा नित्य जप करावा. पक्ष्यांना दाणे घालावे. गरिबांना भोजन करवावे. शनिवारी हनुमान मंदिरात दिवा लावून नैवेद्य दाखवावा.
 
कर्क- संत, वृद्ध आणि गुरुंची सेवा करावी. कुत्रे आणि कावळ्यांना भोजन द्यावे. पितरांनिमित्त दान करावे. हनुमानाच्या मंत्र-स्तोत्राचा यथाशक्ती जप करावा. आई-वडिलांचा अपमान करू नये.
 
सिंह- देवी लक्ष्मी-दुर्गांचे पूजन-अर्चन करावे. कुमारी पूजन-भोजन करवावे. कुत्र्यांना पोळी खाऊ घालावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. हनुमानाची सेवा करावी.
 
कन्या- आपल्या कुलदैवताची किंवा इष्ट देवताची आराधना करावी. क्लेश कमी होतील. गायीला पोळी खाऊ घालावी. दुर्गार्चन शुभ राहील. कोणाचाही अपमान करू नये. कोळसे पाण्यात वाहू घालावे.
 
तूळ- हनुमान बाहुक, हनुमान चालीसा, बजरंग बाण यापैकी एक ते 11 पाठ रोज करावा. माकडांना चणे-गूळ खाऊ घालावे. गाय-कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. आई-वडिलांना नमस्कार करून घरातून निघावे. कोणाचाही अपमान करू नये.
 
वृश्चिक- हनुमानाची आराधना शुभ राहील. शनी दर्शन करावे. लसूण, तेल, लोखंडी वस्तूंचे दान  करावे. महादेवाला जल अर्पित करावे. वरिष्ठ लोकांचा आशीर्वाद मिळवावा. मुंग्यांना आहार द्यावे.
 
धनू- गुरु, संत, वृद्ध लोकांची सेवा करावी. 'श्रीकृष्ण शरणं मम्' जप करावा. 'ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' जप करावा. वस्त्र-भोजन दान करावे.
 
मकर- दुर्गार्चन शुभ राहील. गुरुची सेवा करावी. 'ॐ परम तत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:' जप करावा. कन्या आणि बटुक यांना भोजन करवावे. इष्ट आराधना करावी.
 
कुंभ- ध्यानयोग-राजयोग करावा. श्रीमद् भगवत गीता पाठ नित्य करून मनन करावे. काली-तारा उपासना शुभ राहील. महिलांना सन्मान द्यावा.
 
मीन- पिंपळ, वड, आवळा इतर वृक्ष लावून सेवा करावी. नित्य पिंपळ आणि वडाच्या झाडाखाली दिवा लावून प्रदक्षिणा घालावी.
विशेष : सर्व राशीच्या जातकांनी मुलं, वृद्ध, स्त्री, वनस्पती, नदी, पाणी यांचे सन्मान करावे. अधिक भाषण क्लेशकारक ठरू शकतं. व्यसनांपासून दुरी प्रगतीचा मार्ग दाखवेल. इष्ट आराधना केल्याने संकटापासून बचाव होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुशास्त्रातील महत्त्वाची पंचमहाभूते




Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi