प्रथम भावात गुरु - ज्या जातकाच्या पत्रिकेत गुरु प्रथम भावात विराजमान असेल तर ह्या जातकांचा जन्म पितरांच्या आशीर्वाद किंवा शापामुळे होतो. त्या शापच्या आशीर्वादामुळे तो सुख-दुःख भोगतो.
द्वितीय आणि अष्टम भावात गुरु- ज्या जातकांच्या पत्रिकेत गुरु द्वितीय आणि अष्टम भावात विराज मान असतो असे जातक पूर्वजन्मात संत किंवा संताच्या श्रेणीतील मनुष्य असतात. पूर्व जन्मात काही इच्छांची पूर्ती न झाल्यामुळे यांना परत जन्म घ्यावा लागतो, यांना मृत आत्मेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो.
तृतीय भावात गुरु- ज्या जातकांच्या पत्रिकेत गुरु तृतीय भावात विराजमान असतो तेव्हा त्याचा जन्म कुटुंबातील एखाद्या पूर्वज पतिव्रता महिलेच्या आशीर्वादास्वरूप होतो. यांचे जीवन फार सुखात जात.
चतुर्थ भावात गुरु- ज्या जातकाच्या पत्रिकेत गुरु चतुर्थ भावात विराजमान असेल तर असा जातक आपल्याच कुटुंबातील पूर्व सदस्य असतो. या जातकाचे आपल्या परिवारात पुनर्जन्म होतो. पितरांच्या आशीर्वादामुळे जन्म झाल्यानंतर सुख भोगतो आणि पितरांच्या शाप द्वारा जन्म झाल्याने दुःख उचलतो आणि पूर्ण जीवन भयमुक्त व्यतीत करतो.
पंचम भावात गुरु- ज्या जातकाच्या पत्रिकेत गुरु पंचम भाव एवं एकादश भावात विराजमान असेल तर असा जातक पूर्व जन्मात तंत्र-मंत्र-यंत्र तथा गुप्त विद्येचा जाणकार असतो, पूर्व जन्मात आपल्या स्वार्थासाठी चुकीचे काम तथा दुष्ट आत्मेच्या सहयोगाने काम केले असतात ज्यामुळे या जन्मात यांना मानसिक अशांती असते. गुरुसोबत जर राहू असेल तर या जातकांना जन्म भर त्रास भोगावा लागतो.
द्वादश भावात गुरु - ज्या जातकाच्या जन्म पत्रिकेत गुरु द्वादश भावात विराजमान असेल तर गुरुची स्थिति व गुरु राहूची युती असेल तर असा जातक धार्मिक स्थळांना तोडण्याच्या पापा (दोष)ने ग्रसित असतो. या जन्मात उपयुक्त दोष भोगावे लागतात. असे जातकांना चुकीच्या खान-पानापासून स्वत:चा बचाव करायला पाहिजे. अन्यथा हानी होते.