Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पर्जन्यमान 2018 सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Webdunia
सोमवार, 9 जुलै 2018 (15:54 IST)
8 जून ते 20 ऑगस्ट व 1 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर महाराष्ट्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल. मात्र उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी राहील. त्यामुळे खरीपाचे उत्पादन चांगले होईल तर रब्बी पिकांची हानी संभवते.
 
कर्क संक्रमण कुंडलीनुसार केंद्रस्थानी चंद्र-शुक्र-नेपच्यून अशी ग्रहस्थिती असल्यामुळे या तीन महिन्यात (जुलै ते सप्टें.) चांगली पर्जन्यवृष्टी होईल. विशेषकरून पश्चिम / उत्तर महाराष्ट्र व उत्तर भारत, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागात मोठी पर्जन्यवृष्टी होईल. त्या मानाने पूर्व / दक्षिण भारत व महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता राहील. त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी हा पाऊस अनुकूल असल्याने खरीपाचे उत्पादन चांगले होईल. तुळ संक्रमण कुंडलीमध्ये चतुर्थस्थानी राहू असून केंद्रस्थानी मंगळ-केतू, रवी, शुक्र असे ग्रह असल्याने परतीचा पाऊस कमी प्रमाणात होईल. याचा फटका रब्बीच्या पिकांना बसणार असून यामुळे अनेक राज्यात दुष्काळसद‍ृश स्थिती निर्माण होईल. पूर्व / दक्षिण महाराष्ट्रासह बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने चिंता निर्माण होईल.
 
या जोडीला या काळात अमान्त पौर्णिमांत कुंडलीचा विचार करून एकूण पर्जन्यमान कसे राहील याचा अंदाज घेता येईल.
 
जुलै पूर्वार्ध - अल्पवृष्टी होईल. 14 जुलैपर्यंत साधारण वृष्टी होईल. उत्तरार्ध - 15 जुलैपासून मोठे पाऊस होतील. नद्या, धरणांची पातळी समाधानकारक वाढेल. पर्जन्यकाळातील सर्वाधिक पाऊस जुलैच्या उत्तरार्धात होईल. महाराष्ट्रासह मध्य / उत्तर भारतात पावसाची दमदार हजेरी.
 
ऑगस्ट पूर्वार्ध - 10 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल. मात्र  उत्तरार्धात - 15 ऑगस्टनंतर मोठा खंड पडेल. उष्णता वाढून काही ठिकाणी पावसाअभावी पिकांची हानी होईल. मात्र उत्तर / ईशान्य भारतातील पावसाचा जोर कायम राहील. महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचे मान कमी राहील.
 
सप्टेंबर पूर्वार्ध - 1 ते 10 सप्टेंबर मोठ्या पावसासाठी अनुकूल असून विशेष करून विदर्भ / मराठवाडा, उत्तर भारतात मोठी पर्जन्यवृष्टी होईल. अनेक ठिकाणी सरासरी एवढापाऊस होईल.  उत्तरार्धात - 15 सप्टेंबरनंतर पुन्हा पावसात मोठा खंड पडेल. पावसाअभावी काही जिल्ह्यात दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल. मात्र पश्चिम / उत्तर महाराष्ट्रात बर्‍यापैकी दिलासा मिळेल.
 
ऑक्टोबर पूर्वार्ध - ऑक्टोबर हिट जाणवेल. परतीचा पाऊस समाधानकारक होणार नाही.यामुळे रब्बी पिकांवर या पावसाचा प्रतिकूल परिणाम दिसून येईल. विशेष करून या वर्षी खरीप व रब्बी स्वामी रवी असल्यामुळे एकूण पर्जन्यमान कमी होईल. सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असून अनेक राज्यांत दुष्काळाचा सामना करावा लागेल.
 
जुलै मधील पर्जन्य नक्षत्रनिहाय : 
 
आर्द्रा नक्षत्र - (22 जून ते 5 जुलै) : जूनच्या उत्तरार्धात विशेष करून 22 ते 28 जून चांगला पाऊस होऊन पूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल. मात्र जुलैच्या पूर्वाधात साधारण वृष्टी संभवते.
 
पूनर्वसू नक्षत्र - (6 जुलै ते 19 जुलै) : 10 जुलै पर्यंत साधारण पर्जन्यवृष्टी होईल. मात्र 11 जुलै पासून सर्वत्र मोठी पर्जन्यवृष्टी होऊन महाराष्ट्रासह उत्तर भारतात मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण होईल.
 
पुष्य नक्षत्र - (20 जुलै ते 2 ऑगस्ट) : पूर्ण नक्षत्र मोठ्या पावसासाठी अनुकूल असून देशभर मान्सून पोहोचलेला असेल. मोठ्या पावसामुळे नद्या व धरणांची पातळी सरासरीच्या जवळपास वाढेल. पूर्व / उत्तर भारतात अनेक ठिकाणी पूरामुळे मोठी हानी संभवते.
 
जुलै महिन्यातील पावसाने पुढील वर्षातील पाण्याचा प्रश्‍न मिटेल. प्रमुख धरणे, सरासरी गाठतील. शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.
 
जुलैचा उत्तरार्ध व ऑगस्टचा पूर्वार्ध असा राहील
 
मुंबईसह उत्तर भारत, विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या पावसाने हानी. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती. मोठी जीवित हानी, घरांची पडझड.
 
महागाईमध्ये मोठी वाढ.
 
आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ.
 
शेजारील राष्ट्रांबरोबर युद्धजन्य स्थिती.
 
लेखक, कलाकार, स्त्रीवर्गाला मानसन्मान. मोठ्या पदावर संधी.
 
मोठ्या व्यक्‍ती, मंत्री, धार्मिक व्यक्‍ती यांच्यावर कायदेशीर कारवाई, तुरूंगवास.
 
शेअर मार्केटमध्ये मंदी, मोठे चढ-उतार.
 
मंत्रीमंडळ विस्तार, राजकीय क्षेत्रात मोठे बदल. ज्येष्ठ मंत्र्यांचे राजीनामे. तरूणांना संधी.
 
मोठ्या राजकीय व्यक्‍तीचा मृत्यू.
 
काही राज्यात नेतृत्वबदल. एखाद्या राज्यातील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता.
 
आत्महत्येच्या घटना वाढतील. मोठ्या पदावरील व्यक्‍तीचा आत्महत्येचा  प्रयत्न. 
 - सिद्धेश्वर मारटकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी

आरती सोमवारची

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

अन्नपूर्णा जयंती व्रत कथा मराठी Annapurna Jayanti Vrat Katha

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments