Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही संकेत भविष्य सांगतात, आपल्या यापैकी मिळालेल्या संकेताचे अर्थ जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 2 डिसेंबर 2020 (10:04 IST)
काही विशिष्ट संकेत असतात जी आपल्याला निसर्गाने दिले आहेत. या मध्ये अवयव फडकणे आणि सभोवतालचे वातावरण जाणून घेणं आहे. ज्योतिषशास्त्राच्या एका पुस्तकात शरीराच्या अवयवांच्या फडफडणाच्या बद्दल तपशीलवार वर्णन दिले आहे.

उदाहरणार्थ, कोणतीही घटना होण्यापूर्वी आपल्या शरीराच्या काही भागात कंपन होण्यासारखे संकेत दिसून येतात. जसे की रामायणात आढळून आले की रावणाशी लढायला निघाल्यावर सीता मातेला काही विशिष्ट शुभ संकेत मिळू लागण्यास सुरुवात झाली होती. तसेच रावणाला काही अशुभ संकेत मिळत होते. या संकेतांचे शास्त्र कितपत बरोबर आहे हे सांगता येणं अशक्य आहे.
 
 
* अवयव फडफडणे- 
एखाद्या पुरुषाच्या शरीराचा डावा भाग फडकू लागत असल्यास तर असं समजावं की भविष्यात त्याला दुःखदायी घटनेला सामोरी जावं लागणार आहे. तसेच त्याच्या शरीराच्या उजव्या भागास हालचाल जाणवल्यास त्याला काही चांगली बातमी ऐकू येईल. बायकांच्या बाबतीत हे उलट असते.
 
* एखाद्या माणसाच्या कपाळी हालचाल होत असल्यास - भौतिक सुख.
* कानशिलं किंवा कनपटी फडकत असेल -धनलाभ.
* मस्तक किंवा कपाळ फडकत असल्यास - जमिनीचे लाभ.
*  कपाळ किंवा ललाट फडकत असल्यास - स्नान लाभ.
* डोळा फडकत असल्यास  - धन लाभ
* उजवा डोळा फडकत असल्यास  - सर्व इच्छा पूर्ण होतात.
* डावा डोळा फडकत असल्यास - चांगली बातमी ऐकायला मिळते.
* उजवा डोळा अधिक काळापर्यंत फडकत असल्यास - दीर्घ आजार उद्भवतात.
* खांदा फडकत असल्यास  - सौख्यात वाढ होते.
* दोन्ही भवांच्या मध्ये - सुख आणि आनंदाची प्राप्ती होते.
*  गाल फडकत असल्यास - शुभ कार्य होतात.
* नेत्रकोण फडकल्यावर -आर्थिक प्रगती होते.
* डोळ्याच्या जवळ फडकल्यावर - प्रियकराशी भेट होते.
* ओठ फडकत असल्यास -आयुष्यात नवे मित्र येणार.
* हात फडकल्यावर - चांगल्या कार्यातून धन प्राप्ती होते.
* छाती फडकणे- विजय प्राप्तीचे संकेत आहे.
* हृदय फडकणे - इष्टसिद्धीची प्राप्ती होते.
* नाभी फडकणे - स्त्री हानीचे संकेत असतात.
* पोट फडकणे - पैसे वाढतात.
* गुदा फडकणे - वाहन सुख मिळते.
* गळा फडकणे -  ऐश्वर्य लाभ होते
* तोंड फडकल्यावर मित्र लाभ मिळतो.
* ओठ फडकल्यावर एखाद्या प्रिय वस्तू मिळण्याचे संकेत असते.
 
पक्षी आणि प्राण्यांचे व्यवहार बदलणे -
* मुंगी आपल्या अंडींना उंचावर घेऊन जातांना दिसणे -पाऊस पडतो.
* कावळा गच्चीवर येऊन ओरडत असल्यास -पाहुणे येण्याची शक्यता असते.
* कोणत्याही घराच्या आणि दुकानाच्या प्रवेश दारावर कोळीचे जळमट असल्यास तिथे टाळा लागण्याची शक्यता दाखवतो.
* दीर्घकाळापासून आजारी असणाऱ्याला पांढरा पक्षी दिसल्यास - मृत्यूची चाहूल असते.
* वाटेतून चालत असताना एखाद्यावर चिमणीने घाण केल्यावर- त्याला वाटेवर पैसे सापडतात.
* पाल अंगावर पडणे - शुभ मानले आहे.
* कबूतर - अशुभ असतो.
* पोपट दिसल्यास - हे शुभ आहे.
* मांजर- अशुभ मानली आहे.
* बकरी -बोकड दिसणे शुभ मानतात.
* कोंबडा दिसणे - शुभ.
* हत्ती दिसणे - अत्यंत शुभ मानले जाते.
* डुक्कर दिसणे - शुभ.
* सापाचे दर्शन होणे - दुःख मिळतं.
* वटवाघूळ दिसणे- दुःख मिळते आणि करणी केली जाण्याची शक्यता असते.
* मधमाशी दिसणे -अत्यंत शुभ आहे.
* घोडा दिसणं- शुभ असतं, भूतादि घोड्यापासून लांबच राहतात.
* गरूड दिसणे - अशुभ असतं. ज्या झाडावर गरूड बसतं ते झाड सुकतं.
* उंदराने कारण नसताना घर सोडल्यास ते घर कोसळण्याची शक्यता असते.
 
टीप - वरील पैकी काही मते लोकांच्या मान्यतेवर आणि विश्वासावर आधारित आहे. वाचकांनी स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्यावे.

संबंधित माहिती

Solah Somwar fastसोळा सोमवार व्रत सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Mahadev Aarti शंकराची आरती : लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

Somwar Aarti सोमवारची आरती

आञ्जनेय सहस्रनामस्तोत्रम्

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग,अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वीच्या संवर्धनाची शपथ घेऊ या -गुरुदेव श्री श्री रविशंकर

Chess:डी गुकेशने उमेदवार बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला

World Earth Day 2024 :जागतिक वसुंधरा दिनाचा इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments