ब्रह्मंडामध्ये अगणित तारेतारका, ग्रह, उपग्रह आहेत. दुरून पाहिल्यावर तेथे तार्यांचे अनेक समूह दिसतात. या समूहांतून विविध आकृत्या तयार होतात. तार्यांच्या या समूहालाच नक्षत्र म्हणतात. आकाशमंडळामध्ये २७ समूह आहेत, ज्यांना आपण २७ नक्षत्रे म्हणतो. या २७ नक्षत्रांना १२ भागांमध्ये विभाजित केलं गेलं आहे. त्या १२ भागांना आपण राशी म्हणतो. राशिचक्र म्हणजे नक्षत्रांचे वतरुळ आहे ज्याच्या माध्यमातून सगळे ग्रह आकाशमंडळात गतिशील राहतात. नवग्रहांसोबत अनेक ज्ञात-अज्ञात ग्रह आकाशात फिरत असतात. प्रत्येक ग्रह सतत कोणत्या ना कोणत्या राशीमध्ये असतो. भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये राशी ठरविण्यासाठी ३६0 डिग्रीचा एक पथ मानला गेला आहे. ३६0 डिग्रीला २७ भागांमध्ये विभागले जाते, म्हणजे प्रत्येक नक्षत्र १३ डिग्रीपेक्षा थोडे जास्त असते. याचप्रकारे ३६0 डिग्रीला जर १२ ने विभागले तर प्रत्येक राशी ३0 डिग्रीची होते. आकाशमंडळात राशिचक्राच्या पहिल्या समूहाला अश्विनी म्हणतात. यानंतर भरणी, कृतिका ही नक्षत्रे येतात. भरणी व कृतिका नक्षत्र १३.३0 + १३.३0=२६.६0 डिग्रीने बनतात. म्हणजेच ४ डिग्रींची एक राशी बनते. जर यामध्ये कृतिकाचा प्रथम चरण जोडला तर मेष राशी निर्माण होते. याचप्रकारे आकाशमंडळाच्या परिभ्रमण पथावर प्रत्येकी ३0-३0 डिग्रीवर एक एक राशीची निर्मिती होते. प्रत्येक राशीला विशिष्ट आकार, तत्त्व आणि स्वभाव विशेष गुण असतो.
आपली राशी ओळखाल?
आपल्या जन्माच्या वेळी आकाशमंडळात परिक्रमा करताना चंद्र ज्या राशीत असेल तिला आपली चंद्रराशी मानली जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वावर राशिस्वामीच्या स्वभावातील गुणदोषांचा प्रभाव पडतो. पाश्चात्त्य ज्योतिषामध्ये सूर्यराशीला राशी मानले जाते. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीत विराजमान असेल ती आपली राशी मानली जाते.