Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नावाच्या पहिल्याच अक्षरात दडलाय तुमचा स्वभाव

Webdunia
आपल्या नावाचे पहिले आद्याक्षर आपला स्वभाव तसेच आपले जीवन कसे असेल हे सांगते. इतकच नव्हे तर आपले यश-अपयश आणि आपल्या लव लाईफ बाबतही सांगत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
A :  A आद्याक्षरापासून नाव सुरु होणारे लोक मेहनती आणि धाडसी असतात. कठीण प्रसंगांचाही हे मोठ्या धैर्याने सामना करतात. यांना आपल्या प्रेमाचा दिखावा करायला आवडत नाही. पण, प्रेम आणि नाती जपणे त्यांना योग्य प्रकारे जमते. लपवाछपवी करुन बोलणे यांना आवडत नाही. थेट आणि सरळ बोलल्यास कोणत्याही कठीण प्रसंगांचा हे सामना करु शकतात. मात्र, यांना कोणत्याही कारणावरुन लगेच थोडा राग येतो. पण पुन्हा ते शांत ही होतात.
 
B: B अक्षरापासून नाव सुरु होणारया व्यक्ती संकुचीत स्वभावाच्या असतात. पण, आयुष्यात नेहमी नवीन मार्गांचा शोध घेणे यांना आवडते. यांचे आयुष्य काहीसे रहस्यमय असते. अशा व्यक्ती फार कमी लोकांशी मैत्री करतात. प्रेमाच्या बाबतीत यांच्या पदरी कधी कधी निराशा पडते.
 
C: नावात C आद्याक्षर असलेल्या व्यक्ती खूप यशस्वी असतात. दुसरयांची सुख-दुखे: ते समजून घेतात. ते स्वभावाने भावनिक असतात.
 
D: D आद्याक्षराची माणसे ‘ऐकावे जनाचे करावे मनावे’ काहीसा अशा प्रकारचा स्वभावाची असतात. कोणतेही काम या व्यक्ती मन लावून करतात. प्रेमाच्या बाबतीत ते काहीसे जिद्दी असतात. या लाेकांना मिञांना पार्टी द्यायला आवडते.
 
E: E अक्षरापासून नाव सुरु होणारे फटकळ स्वभावाचे असतात. पण, यांच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडत असतात. यांचे मन चंचल असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत ते फार यशस्वी होत नाहीत.
 
F: F या आद्याक्षराच्या व्यक्ती जबाबदार स्वभावाच्या असतात. यांना एकट राहायला आवडत असून, ते खूप भावनिक असतात. यांचा आत्मविश्वास दांडगा असतो. आपल्या जोडीदाराला हे भरभरून प्रेम देतात.

G: G या आद्याक्षराच्या व्यक्ती निर्मळ स्वभावाच्या असून, दुसरयांना मदत करण्यास त्या नेहमी तत्पर असतात. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती हळव्या असतात.
 
H: H या आद्याक्षराच्या व्यक्ती हसतमुख स्वभावाच्या असून त्यांचे मन निर्मळ असते. यांना ऐंशोआरामात जीवन जगायला आवडते. प्रेमाच्या बाबतीतही हे काहीसे वेडे असतात.
 
I: I या आद्याक्षराचे लोक कलाकार प्रकारचे असतात. यामुळेच ते नेहमी जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. प्रेमाच्या बाबतीत हे काही फार विशेष नसतात.
 
J: J या आद्याक्षराच्या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात. सर्व गुण संपन्न अशा या व्यक्ती दिसायलाही सुंदर असतात. शिक्षणात हे थोडेसे मागे असले तरी, जबाबदारया पूर्ण करण्यात त्या कमी पडत नाहीत. आपल्या जोडीदाराची साथ ते कधीही सोडत नाहीत. लोकांना जास्ती टेंशन देतात.
 
K: K आद्याक्षराच्या व्यक्ती परफेक्शनीस्ट तसेच रोमँटिक असतात. पण, काहीशा स्वार्थीही असतात. त्या आधी स्वत:चा नंतर जगाचा विचार करतात.

L: L आद्याक्षरापासून नाव सुरु होणारया व्यक्ती खूप उत्साही असतात. सगळ्यांसह त्या प्रेमाने वागतात. आपल्याच कल्पना विश्वात रमण्यात आणि कुटुंबासह रहायला त्यांना आवडते.

M: Mआद्याक्षराच्या व्यक्ती नेहमी मनं मिळावु आणि रोमँटीक स्वभावाचे असतात. यामुळे हे नेहमी बिनधास्त राहतात आणि दुस-यालाही खुष ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे वचनाचे पक्के असतात. हे आपल्याच मस्तीत राहणे जास्त पसंद करतात. हे भावूक ही तेवढचे असतात. आणि हे लोकांचे दुःख पाहू शकत ही नाही. वेळेला हे मदतीला ही पुढे सरतात.

N: N आद्याक्षराच्या व्यक्ती ओपन माईंडेड परंतू, तितक्याच महत्वाकांक्षीही असतात. नाते संबध ते योग्य प्रकारे जपतात ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात व भाऊक असतात, अपमान सहन करत नाही.
 
O: O आद्याक्षराच्या व्यक्ती काही बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून करुन दाखवतात. प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रामणिक असतात.
 
P: P या अक्षराने नाव सुरु होणारया व्यक्ती कायम तणावामध्येच गुरफटलेल्या असतात. मात्र, आपल्या जवळच्या व्यक्तीची सोबत ते कधीही सोडत नाहीत.
 
Q: Q आद्याक्षराच्या व्यक्ती फारशा महत्वकांक्षी नसतात. पण, त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते. यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या व्यक्ती क्रिएटीव्ह असतात.

R: या व्यक्तींना आव्हानांचा सामना करायला आवडतो. यात ते यशस्वीही होतात. या व्यक्ति दुसर्याची टिंगलटवाळी करण्यात पटाईत असतात माञ यांची टिंगलटवाळी केलेली यांना आवडत नाही. लगेचच राग येतो.
 
S: S आद्याक्षराच्या व्यक्ती खूप मेहनती पण, थोडेसे बोलबच्चन ही असतात. मात्र, ते मनाने चांगले असले तरी ते हट्टी असतात.पण प्रेमाच्या बाबतीत हे लोक लाजाळू आणि तितकेच कट कटी नी गंभीर स्वभावाचे असतात. हे लोक मन मिळाऊ असतात पण दुसरयाला मदत करणारे असतात.. थोडे जुन्या विचाराचे असतात.. आपल्या पेक्षा  वरचढ झालेला दुसरा कोणी त्यांना मना पासून आवडत नाही.
 
T: T आद्याक्षरापासून नाव सुरु होणारया व्यक्ती उत्साही तसेच आनंदी स्वभावाच्या असतात. पैसा खर्च करताना हे बराच मागचा-पुढचा विचार करतात. यांच्या हातातुन पैसा लवकर सुटत नाही हे लाेक विनाकारण सुट्टी काढत नाहीत. आपल्या मनातील गोष्टी हे लवकर कोणाजवळ बोलत नाहीत.
 
U: U  आद्याक्षराच्या व्यक्तींना एखाद्याचे मन कसे जिंकायचे यांची कसब चांगली जमते. यांचे कोणतेही काम बिघडल्याशिवाय पूर्ण होत नाही.
 
V: V या आद्याक्षराच्या व्यक्तींचा स्वभाव मनमोकळा असला तरी कोणाच्याही बंधनाखाली राहून काम करायला यांना आवडत नाही. मनात प्रेम असुनही हे कधीही आपले प्रेम किंवा मैत्री लगेचच व्यक्त करत नाहीत. हे सर्वात शेवटी हळू हळू आपले मत व्यक्त करत असतात. मैञी किंवा प्रेम करणे यांच्या कडुन शिकावे. हे लाेक मैञी आणि प्रेमाला जिवापाड जपतात. हे स्वभावाने थोड़े फार रागीष्ट नी तेवढेच मायाळू आणि भावूक ही असतात.. पण आपल्या जिवाचा आनंद ही तेवढाच लूटतात.

W: W या अक्षराने नाव सुरु होणारया व्यक्ती संकुचित वृत्तीच्या असतात. यांचा इगो खूप मोठा असल्याने नाते संबंधामध्ये दूरावा तसेच तणावही निर्माण होतो. प्रेमाच्या बाबतीत कोणताही दिखावा करण्यास यांना आवडत नाही.
 
X: X आद्याक्षरापासून नाव सुरु होणारया व्यक्ती थोड्या विक्षिप्त स्वभावाच्या असतात. प्रेमाच्या बाबतीत हे काहीसे मागेच असतात.
 
Y: Y या आद्याक्षरापासून नाव सुरु होणारया व्यक्ती राजेशाही स्वभावाच्या असतात. 
बघताक्षणीच हे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव सांगतात. मात्र, यांना जास्त बोलायला आवडत नाही. प्रेमात आपल्या साथीदाराबाबतच्या अनेक गोष्टी ते विसरतात.
 
Z: Z या आद्याक्षराच्या व्यक्ती मनमिळावू स्वभावाच्या असून, यांचे राहणीमान साधे असते. आपल्या प्रेमापुढे हे कोणत्याही गोष्टीला जास्त महत्व देत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीला या 3 वस्तू नक्की खरेदी करा, आर्थिक स्थिती मजबूत होईल

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी भात

श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड

Srikshetra Gangapur Yatra दत्त भक्तांची पंढरी, श्रीक्षेत्र गाणगापूर

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments