काही ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत. ते विधी आपल्या कन्येच्या हातून केल्यास तिच्या विवाहातील अडचणी दूर होतील.
हे विधी खालीलप्रमाणे-
१. महिन्याच्या शुध्द चतुर्थीला चांदीच्या छोट्या वाटीत गायीचे दूध घेऊन त्यात साखर व भात घ्या. चंद्रोदयाच्या वेळी त्यात तुळशीचे पान ठेवून नैवेद्य दाखवा आणि स्वत:भोवती प्रदक्षिणा घाला. 45 दिवस असे केल्यानंतर एका कुमारीकेला भोजन देऊन तिला कपडे, मेंदी दान म्हणून द्यावे. हे व्रत नियमित पूर्ण केल्यास सुयोग्य वराची प्राप्ती होऊन लवकरच विवाह होतो.
२. आठवड्यात गुरूवारी सकाळच्या प्रहरी प्रात:विधी आटोपून पीठामध्ये किंचित हळद मिसळून किमान पाच पोळ्या तयार कराव्यात. प्रत्येक पोळीवर गुळ ठेवावा व गायीला खाऊ घालाव्या. 7 गुरूवार हा विधी नियमित केल्याने तत्काळ विवाह जुळतात.
३. दर मंगळवारी उपवास करावा. देवीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल देवीच्या चरणाशी वाहून पूजन करावे. हे व्रत नऊ मंगळवार करावे. शेवटच्या मंगळवारी त्याचे उद्यापण करावे. या दिवशी नऊ वर्ष वयाच्या कुमारीकाना भोजन, लाल वस्त्र, मेंहदी व दक्षिणा द्यावी.
WD
४. कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि। नंद गोपसुतं देवि पतिं में करू ने नम:।। ( कात्यायनिमंत्र श्रीमद् भागवत)
कात्यायनी देवी किंवा पार्वती देवीच्या प्रतिमेसमोर बसून कात्यायनी मंत्राचा एक माळ जप दररोज केल्याने विवाहातील सगळ्या समस्या दूर होतात.
५. हे गौरी! शंकरर्धाडि्गस यशा त्वं शंकरप्रिया। तथा मॉं करूं कल्याणिस कान्तं कान्तां सुदुर्लभाम्।।
भगवती आई पार्वती मातेचे पूजन करून वरील मंत्राचा पाच वेळी प्रतिदिन जप केल्याने मनाप्रमाणे वर मिळतो.
६. श्री गणपती अथर्वशीर्षचे दररोज बारा वेळा पाठ करावा. अथर्वशीर्षच्या प्रत्येक मंत्र झाल्यानंतर गणपतीच्या प्रतिमेस दूर्वा अर्पण करावी. हे व्रत 84 दिवस नियमित केल्याने मनोकामना पूर्ण होतात.