Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनी जयंती 2017: या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी करा हे काम

Webdunia
शनी जयंतीचा लाभ घेण्यासाठी सर्वातआधी स्नान इत्यादीहून शुद्ध होऊन एका लाकडाच्या पाटावर काळं कापड पसरून त्यावर शनीची प्रतिमा किंवा फोटो किंवा एक सुपारी ठेवून त्याच्या दोन्हीकडे शुद्ध तूप आणि तेलाचे दिवे प्रज्वलित करावे.
 
या प्रतीकाला जल, दूध, पंचामृत, तूप, अत्तर याने स्नान करवून इमरती किंवा तेलात तळलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखविण्यापूर्वी त्यावर अबीर, गुलाल, शेंदूर, कुंकू आणि काजळ लावून निळे किंवा काळे फूल अर्पण करावे. नैवेद्य अर्पण केल्यावर फळ आणि श्रीफळ अर्पित करावे.
 
या पूजेनंतर या मंत्राची किमान एक माळ जपावी.
 
'ॐ प्रां प्रीं प्रौ स. शनये नमः' 
 
माळ पूर्ण झाल्यावर आरती करून शनीदेवाची आराधना करावी.
 
शनी जयंतीला या कामांवर लक्ष द्या:
 
* सूर्योदय पूर्वी शरीरावर तेल मालीश करून स्नान करावे.
* मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यावे.
* ब्रह्मचर्य पालन करावे.
* वृक्षारोपण करावे.
* यात्रा करणे टाळावे.
* तेलात तळलेल्या खाद्य पदार्थांचे दान गाय, कुत्र्या किंवा भिकार्‍याला करू नये.
* अपंग आणि वृद्ध लोकांची सेवा करावी.
* शनीचा जन्म दुपारी किंवा सायंकाळी असल्यावर मतभेद आहे. म्हणून या दोन्ही काळात मौन धारण करावे.
* या दिवशी सूर्य व मंगळाची पूजा करू नये.
* शनीची आराधना करताना त्यांच्या डोळ्यात बघू नये. 

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुढील लेख
Show comments