Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

8 ते 24 एप्रिलपर्यंत या 5 राशींचे उजळणार भाग्य

Webdunia
शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (16:00 IST)
Budh Rashi Parivartan April 2022: बुध हा वाणी आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. शुक्रवार, 08 एप्रिल रोजी बुधाचे राशी परिवर्तन होणार आहे. या दिवशी बुध मीन राशीतून निघून दुपारी 12:05 वाजता मेष राशीत प्रवेश करेल. 24 एप्रिल, रविवारपर्यंत बुध मेष राशीत राहील. बुध मेष राशीत प्रवेश करत असल्याने सर्व 12 राशींवर परिणाम होईल. या काळात काही लोकांची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल, तर काही लोकांसाठी ही दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. जाणून घ्या बुध संक्रमणामुळे कोणत्या राशीला फायदा होईल-
 
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना बुध मेष राशीत प्रवेश केल्याने लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना फायदा होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. 08 ते 24 एप्रिल दरम्यान तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते.
 
कर्क- कर्क राशीच्या लोकांना बुधाच्या गोचरामुळे शुभ परिणाम मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही तुमच्या कामाचा इतरांवर प्रभाव पाडाल. यावेळी नवीन कल्पना घेऊन तुम्हाला यश मिळू शकते. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल.
 
धनु- मेष राशीत बुधाचेगोचर धनु राशीशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी देऊ शकते. समाजात मान-सन्मान मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रेम जीवनात थोडा संयम ठेवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.
 
मकर- मकर राशीच्या लोकांना मेष राशीत बुधाच्या गोचराचा लाभ मिळेल. 8-24 एप्रिलपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. या काळात तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता. करिअरमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तथापि, या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
 
मीन - मीन राशीच्या लोकांना बुधाच्या संक्रमणादरम्यान पैसा मिळू शकतो. व्यवसाय करणार्‍या लोकांना मोठी डील मिळू शकते, ज्यातून नफा संभवतो. तुमची प्रतिमा सुधारेल. कर्जापासून मुक्ती मिळू शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारी करा आरती सूर्याची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

Kaal Bhairav Jayanti 2024: काल भैरव जयंती कधी आहे? पूजेची तारीख आणि पद्धत

श्री सूर्याची आरती

संत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल 5 खास गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments