Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्र ग्रहण 2020 : तीन तासांहून जास्त काळाचे ग्रहण, सुतक कालावधी आणि उपाय जाणून घ्या

चंद्र ग्रहण 2020 : तीन तासांहून जास्त काळाचे ग्रहण, सुतक कालावधी आणि उपाय जाणून घ्या
, गुरूवार, 4 जून 2020 (07:08 IST)
यंदा जूनच्या महिन्यात दोन ग्रहण पडणार आहेत. पहिले ग्रहण 5 जून रोजी आहेत. हे चंद्र ग्रहण अनेक दृष्ट्या महत्त्वाचे आहे आणि काही राशींसाठी चेतावणी आणि काहींसाठी आनंदी असणार आहेत. चंद्र ग्रहणा बाबत आपल्याला विशेष काळजी घ्यावयाची आहे. बऱ्याच वेळा असे आढळून आले आहेत की लोकं याला दुर्लक्षित करतात. पण ह्याचा थेट परिणाम आपल्या जीवनांवर पडतो.  
 
5 जून रोजी लागणाऱ्या या ग्रहणाची कालावधी 3 तास आणि 18 मिनिटाची असणार. या दिवशी काय करायला हवं आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे.  
 
चंद्रग्रहण म्हणजे काय?
चंद्र पृथ्वीच्या अगदी पाठी असतो त्या खगोलशास्त्रीय स्थितीला चंद्रग्रहण म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार हे फक्त पौर्णिमेलाच होणं शक्य असतं.
 
चंद्रग्रहण कधी असणार?
भारतीय वेळेनुसार 5 जून रोजी रात्री 11:16 वाजता होणारे हे ग्रहण पुढील तारखेला म्हणजेच 6 जून रोजी रात्री 2:32 वाजे पर्यंत असणार.
 
कोणत्या राशींवर ग्रहण असणार?
ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार हे ग्रहण वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्रांवर लागणार आहे.  
 
सुतक काळ म्हणजे काय?
या दरम्यान एक अशुभ वेळेची सुरुवात होणार आहे, त्यावेळेस स्वतःला जपण्याची विशेष गरज असणार. हे सुतक काळ चंद्रग्रहणाच्या तब्बल 9 तासांपूर्वीच सुरू होणार आणि ग्रहणाच्या बरोबरच संपणार. म्हणजेच रात्री 2 वाजून 32 मिनिटांवर.
 
ग्रहणाच्या दरम्यान काय सावधगिरी बाळगावी?
काही धर्मगुरुंच्या म्हणण्यानुसार ग्रहण काळात काही अश्या गोष्टी आहे ज्या टाळल्या पाहिजेत, नाही तर त्याचा दुष्प्रभाव आपल्या जीवनांवर पडू शकतो. सुतक काळाच्या वेळी बऱ्याच नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असतं. म्हणूनच त्याच वेळी आपल्या काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
 
* या दरम्यान देवाची पूजा करू नये. मूर्तीस स्पर्श करू नये. जवळपासच्या देऊळाचे दार देखील बंद करायला हवं. असे घरामध्ये देखील केले पाहिजे.
* कोणतेही शुभ कार्य या काळात करू नये. कारण त्यापासून कोणताही फायदा मिळणार नाही.
* गरोदर बायकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ग्रहण काळात त्यांनी घरातून बाहेर पडू नये. तसेच चंद्राला बघू नये. असे केल्यास आई आणि बाळावर त्याचा दुष्प्रभाव पडतो.
* ग्रहण काळात चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नये. याचा वाईट दुष्प्रभाव गर्भाशय वर पडतो.
* या दरम्यान स्मशानभूमीच्या ओवती-भोवती फिरू नये. कारण या वेळी नकारात्मक शक्ती बळकट होते.
* शक्य असल्यास या काळात काहीही शिजवू नये आणि खाऊ देखील नये.
* ग्रहण काळात नख, दाढी आणि केस कापू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रग्रहण 2020 : 5 जून रोजी चंद्रग्रहण, 5 खबरदाऱ्या आणि 5 उपाय