Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खंडग्रास सूर्यग्रहण 2020 : जाणून घ्या solar eclipse विषयी 15 खास गोष्टी

webdunia
सोमवार, 15 जून 2020 (12:35 IST)
21 जून रविवार रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. जाणून घ्या या दरम्यान काय करावं आणि काय करू नये, 15 खास गोष्टी
1 ग्रहण काळात संयमाने जप आणि ध्यान केल्याने अनेक पटीने फलप्राप्ती होते.
2 ग्रहण काळात अन्न ग्रहण करणार्‍या व्यक्तीला भक्षण केलेल्या अन्नाच्या दाण्याइतकं वर्षे नरक भोगावं लागतं.
3 ग्रहण काळात तीन प्रहर (9) तास आधी जेवण करू नये. वयोवृद्ध, लहान मुले, आणि आजारी माणसं दीड प्रहर (4:30) तास आधीपर्यंत खाऊ शकतात.
4 ग्रहणाच्या वेध लागण्याच्या आधी ज्या पदार्थांमध्ये कुश किंवा तुळशीचे पानं ठेवतात ते पदार्थ दूषित होत नाही. तसेच शिजवलेले अन्न टाकून द्यावे त्याला गायी, आणि कुत्र्यांना खायला द्यावे. ग्रहण संपल्यावर अंघोळ करून ताजे अन्न शिजवायचे.
5 ग्रहणाचे वेध लागण्याआधी तीळ किंवा कुशाचे पाणी गरज असल्यासच वापरावे. ग्रहण लागल्यापासून ते ग्रहण संपेपर्यंत अन्न किंवा पाण्याचे सेवन करू नये.
6 ग्रहण स्पर्शाच्या वेळेस अंघोळ, ग्रहणाच्या मध्य काळात होम, देवपूजा आणि श्राद्ध आणि शेवटी कपड्यांवरून अंघोळ करावी. बायका डोकं न धुताही अंघोळ करू शकतात.
7 ग्रहण पूर्ण झाल्यावर ज्याचे ग्रहण आहे त्याचे शुद्ध रूप बघितल्यावरच जेवण करावं.
8 ग्रहण काळात स्पर्श केलेले कापडं शुद्ध करण्यासाठी धुवावे आणि स्वतःही कापड्यांवरून अंघोळ करावी. 
9 ग्रहणाच्या वेळेस गायींना गवत, पक्ष्यांना अन्न धान्य, गरजूंना कापड्यांची देणगी दिल्याने अनेक पुण्य मिळतात.
10 ग्रहणाच्या दिवशी पानं, पेंढा, लाकूड आणि फुल तोडू नये. केस आणि कपड्यांना पिळू नये आणि दात घासू नये.
11 ग्रहणाच्या वेळेस ताळा उघडणे, झोपणे, मलमूत्र विसर्जन करणे, शारीरिक संबंध ठेवणे, आणि जेवण करणे हे सर्व काही वर्जित आहे.
12 ग्रहणाच्या वेळेस कोणतेही शुभ आणि नवे कार्य सुरू करू नये.
13 ग्रहणाच्या वेळेस आपल्या गुरुचे नाम स्मरण, इष्टाचे नाम स्मरण किंवा देवाचे नामस्मरण करावे. असे न केल्याने मंत्राची शुद्धता राहत नाही. ग्रहणाच्या वेळी कोणाकडील अन्न खाल्ल्याने 12 वर्षाचे पुण्य नष्ट होतात.
14 भगवान वेदव्यास ह्यांनी हिताचे मंत्र उच्चारले आहे - सामान्य दिवसापासून चंद्रग्रहणात केलेले पुण्य कार्ये (जप, ध्यान, दान ) 1 लक्ष आणि सूर्यग्रहणात 10 लक्ष पटीने फळ देणारे असतात. गंगेचे पाणी जवळ असल्यास चंद्रग्रहणात 1 कोटी आणि सूर्यग्रहणात 10 कोटी पटीने फायदेशीर आहे.
15 गरोदर बायकांना ग्रहण काळाच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे. 3 दिवस किंवा 1 दिवस उपास करून दान देण्याचे चांगले फल मिळतात. परंतू संतान असणार्‍या गृहस्थाने ग्रहण आणि संक्रांतीच्या दिवशी उपवास करू नये.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

साप्ताहिक राशीफल 14 ते 20 जून 2020