पैसे मिळवणे, वाढवणे आणि वाचवणे हे फार महत्त्वाचं आहे. बरेच लोक तक्रार करतात की पैसे या हातून येतात आणि त्या हाताने जातात. काही लोक तक्रार करतात की पैसे येणारच नाही तर वाढणार कसे? सांसारिक जीवनात पैश्यांशिवाय सर्व निरर्थक आहे. म्हणूनच हे चार मार्ग आपल्या पैशाला सुरक्षित ठेवणार.
हिंदू धर्म ग्रंथ महाभारतातील विदुर नीती मध्ये लक्ष्मी अधिकारी बनण्यासाठी विचार आणि कर्माशी जुळलेले 4 महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली आहे. जाणून घेऊ या चार पद्धती ज्यांना अवलंबवून जाणकार असो किंवा अज्ञानी दोघे ही श्रीमंत होऊ शकतात.
श्लोक:-
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भात् सम्प्रवर्धते
दाक्ष्यात्तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठत्ति
अर्थ -
1 पहिला मार्ग -
चांगले किंवा मंगळ कर्म केल्यानं कायमस्वरूपी लक्ष्मी येते. याचा अर्थ असा की परिश्रम आणि प्रामाणिक पणाने केलेल्या कामाने संपत्ती मिळते.
2 दुसरा मार्ग -
प्रगल्भता म्हणजे संपत्तीचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूक आणि बचत करून ते सतत वाढतं. जर आपण पैसे वाढविण्यासाठी योग्य कामात लावले तर नक्कीच फायदा होणार.
3 तिसरा मार्ग -
युक्ती किंवा हुशारी याचा असा अर्थ आहे की जर पैशाचा उपयोग हुशारीने केला गेला आणि उत्पन्नाच्या खर्चाची काळजी घेतली गेली तर पैशाची बचत होईल आणि पैशात वाढ देखील होईल. या मुळे पैशाचे संतुलन बनलेले राहतील.
4 चवथा मार्ग -
चवथा आणि अंतिम सूत्र म्हणजे संयम, म्हणजे मानसिक, शारीरिक आणि वैचारिक संयम राखल्याने धनाची रक्षा होते. याचा अर्थ असा की आनंद मिळविण्यासाठी आणि आपले छंद पूर्ण करण्याच्या नादात धनाचे अपव्यय करू नये. आपल्या पैशाला घर आणि कुटुंबीयांचा आवश्यक गरजांसाठी खर्च करावे.
तर हे होते विदुराचे धोरण, यांच्यानुसार आपल्या पैशाला मिळवणे, वाढवणे आणि वाचविण्यासाठीचे चार मार्ग. वास्तविक आपण पैशांची बचत करण्यापेक्षा त्याला वाढविण्याबद्दल अधिक विचार केला गेला पाहिजे. आपणास हे देखील माहीत असावे की ज्या कुटुंबात आनंद, प्रेम, बंधुता आणि स्वच्छता असते तेथे श्रीमंती असते. तसेच घर देखील वास्तुनुसार असावे.