Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुधवारी करा हे अत्यंत सोपे उपाय, धन मिळेल, नोकरी-व्यवसायात यश लाभेल

Webdunia
आज आम्ही आपल्याला बुधवारचे असे काही सोपे उपाय सांगणार आहोत जे आपण दिवसभरात कधीही करू शकता आणि गणपतीची कृपा प्राप्त करू शकता. उपाय अगदी सोपे आहे पण मनोभावे आणि श्रद्धापूर्वक करणे गरजेचे आहे. या उपायांनी आपल्याला निश्चित आर्थिक लाभ मिळेल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील... तर चला जाणून घ्या काय उपाय आहेत:
 
 
1. बुधवार हा दिवस गणपतीचा वार असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून या दिवशी गणपतीची आराधना करायची म्हणजे या दिवशी आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करणे फलदायी ठरेल. आपण आपल्या सोयीप्रमाणे पाठ करू शकता.
 
2. या दिवशी गणपती मंदिरात जाऊन गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या आणि सामर्थ्यानुसार मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा.
 
3. बुधवारी काही पैसे किन्नर अर्थात तृतीय पंथींनी दान म्हणून द्यावा. नंतर त्यातून काही पैसे आशीर्वाद स्वरूप त्याच्याकडून पुन्हा घेऊन स्वतःजवळ ठेवावे. नंतर हे पैसे पूजा स्थळी ठेवून पूजा करून त्याला धूप उदबत्ती दाखवून त्यांना हिरव्या कपड्यात गुंडाळून घ्यावे. आता हे तिजोरी किंवा कपाटातील लॉकरमध्ये ठेवावे. किंवा आपण धन ठेवत असलेल्या ठिकाणी हे पैसे ठेवावे. याने भरभराटी येत.
 
4. आपण तांत्रिक उपाय करण्याच इच्छुक असाल तर या दिवशी 7 अख्ख्या कवड्या आणाव्या. या कवड्या पूजन सामुग्री मिळत असलेल्या दुकानात सहज मिळतात. यासोबत एक मूठभर हिरवे अख्खे मूग घेऊन दोन्ही वस्तू एका हिरव्या कपड्यात बांधाव्या. आता हे गुपचुप जाऊन एखाद्या मंदिराच्या पायर्‍यांवर ठेवून यावा. पण विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे याबद्दल चर्चा करू नये. हा उपाय करत असल्याचे कुणालाही सांगू नये. पण उपाय करताना मनात श्रद्धा असणे गरजेचे आहे.
 
5. बुधवारी सव्वा पाव मूग उकळून त्यात तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घालावी. हा उपाय केल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. कर्जामुळे परेशान व्यक्तीने हा उपाय नक्की करून बघावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण Shiv Jayanti Speech

Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

श्री सद्गुरु पादुका पूजनात श्रीगुरुंचे आवाहन

श्री गजानन महामाला मंत्र

Valga suktam in marathi नजरदोष, शत्रूपीडा आणि दारिद्रय यापासून मुक्ती मिळेल, वल्गा-सूक्त पठण करा

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments