Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलांचे मन अभ्यासात लावण्यासाठी काही टिप्स अवलंबवा

मुलांचे मन अभ्यासात लावण्यासाठी काही टिप्स अवलंबवा
, सोमवार, 8 मार्च 2021 (21:59 IST)
आजकाल प्रत्येक आई-वडिलांना काळजी असते की त्यांच्या मुलांनी चांगला अभ्यास करावा. पण सध्याच्या काळात हे अवघड झाले आहे कारण मुलांचे लक्ष्य अभ्यासात न लागता खेळण्याकडे जास्त असते. किंवा मोबाईल मध्ये असते. मुलांमध्ये अभ्यासासाठी गोडी कशी निर्माण करावी हे जाणून घेण्यासाठी काही टिप्स आहेत. चला तर मग ते जाणून घेऊ या.
 
1 मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा-
हे सर्वांना माहीत आहे की टीव्ही आणि मोबाईलमुळे मुलं अभ्यास करत नाही .अशा परिस्थितीत प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे की त्यांनी टीव्ही बघण्यासाठी आणि मोबाईल हाताळण्याची वेळ ठरवून द्यावी. 
 
2 अभ्यासासाठी लक्ष्य केंद्रित करा- 
मुलांचे अभ्यासासाठी लक्ष्य केंद्रित करावे. जेणे करून मुलं अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यासच करतील. या व्यतिरिक्त मुलांनी काहीच काम करू नये. मुलांची अभ्यासाची खोली वेगळी असावी. जेणे करून मुलं फक्त अभ्यासावर लक्ष्य केंद्रित करू शकेल.
 
3 अभ्यासासाठी मुलांना प्रेरित करा-
मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित करा, त्यांना अभ्यासाचे महत्त्व समजावून सांगा. की अभ्यास करून लोक किती मोठे होतात. नाव मिळवतात. अशा प्रकारे त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करावे.  
 
4 अभ्यास करण्याचे चांगले मार्ग अनुसरणं करा- 
मुलांना अभ्यासात मन लावण्याचे अनेक मार्ग असू शकतात. असं काही नाही की मुलांना नेहमी पुस्तकातूनच शिकवावे. पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त त्यांना भौतिक ज्ञान देखील देऊ शकतो. मुलं डोळ्याने जे काही बघतात ते लवकर लक्षात ठेवतात.  
 
5 अभ्यास करण्याचे फायदे सांगा- 
मुलांना नेहमी अभ्यास केल्याचे फायदे सांगा. त्यांची आवड कशा मध्ये आहे ते जाणून त्यांना त्याचे महत्त्व समजवा. जसे की त्यांना डॉक्टर बनायचे आहे किंवा वकील किंवा इतर काही. त्यांना त्याचे महत्त्व सांगा. की जर त्यांनी अभ्यास केला तर ते या पैकी काहीही बनू शकतात. 
 
6 मुलांवर अनावश्यकपणे दबाव आणू नका- 
पालकांचे आपल्या पाल्यांकडून खूप अपेक्षा असतात. या साठी ते त्यांच्या वर अनावश्यक तणाव आणतात. असं करू नका. त्या मुळे त्यांना अभ्यासाची भीती वाटू शकते. किंवा त्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. 
 
7 मुलांची आवड जाणून घ्या- 
प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांनी जाणून घ्यावे की आपल्या मुलाला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे. जर आपल्या मुलाची इच्छा इंजिनियर बनायची आहे तर त्याला डॉक्टर बनण्यासाठी बाध्य करू नका. असं केल्याने त्याचे मन अभ्यासात लागणार नाही. त्याची आवड जाणून घ्या. त्यामुळे मुलं अभ्यासात चांगली कारकीर्दी करू शकेल.
 
8  मुलांची वैचारिक पद्धत विकसित करा- 
मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांना स्वतःहून विचार करू द्या. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्वचेचे पुरळ व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे येऊ शकतात