Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लठ्ठपणावर उपयोगी सदाफुली

सौ. देवयानी वि. चिटगोपकर
घरोघर आढळणारी पांढर्‍या फुलांची बाराही महिने फुलणारी सदाफुली किती औषधी गुणयुक्त आहे याची आपल्याला कल्पनाही नाही. सदाफुली आजच्या युगातील दोन भयंकर विकार- मधुमेह आणि लठ्ठपणा यावर आश्चर्यजनकरीत्या परिणामकारक असल्याचे आढळून आली आहे. रक्ताच्या कर्करोगातही ही फुले फार गुणकारी आहेत.

Shreeya
सदाफुली हलकी, रुक्ष, कघाय, तिक्तरसयुक्त, विपाकात कटु व उष्णवीर्य समजली जाते. ती वात आणि पित्ताचे शमन करते, मेंदूला शांती देते, प्रमेहाचा नाश करते, मधुमेह नियंत्रित करते. ती भारनाशक असून लठ्ठपणा दूर करते. सदाफुलीच्या मुळाच्या सालीत फेलोनिक राड, एक उडनशील तेल, दोन अल्कोहोल, दोन ग्यालकोसाइड, टॅनिन, करोटिनाइड, स्टिरॉल व उससोलीक अॅसिड असते.

सदाफुलीच्या पाना-फुलांचा-मुळांचा उपयोग अनिद्रा आणि मानसिक उद्रेक दूरकरून शांती प्रदान करण्यासाठी केला जातो. विंचू आदि‍ विषारी प्राणी किंवा किडे चावले असता सदाफुलीच्या सालीचा लेप लावल्यास किंवा पानांचा रस चोळल्यास फायदा होतो. सदाफुलीची जांभळ्या रंगाची फुले मधुमेहात रक्तशर्करा कमी करण्यासाठी गुणकारी आहेत.

एका कपात तीन ताजी फुले घेऊन त्यात अर्धा कप गरम पाणी टाकावं. पाच-सहा निनिटांनी फले काढून टाकावीत. एवढ्या वेळात फुलांचे गुणततत्त्व पाण्यात उतरतील. हे पाणी रोज सकाळी अनशापोटी 8-10 दिवस घेऊन रक्तशर्करा तपासून अगोदरची आणि नंतरची तुलना करावी. रक्तशर्करा घटली असल्यास 8-10 दिवसांनी पुन्हा हा प्रयोग करून पहावा.

लठ्ठपणा दूर करण्यासाठी रोज सकाळी सदाफुलीची 3 पांढरी फुले खूप चाऊन चाऊन 8/10 दिवस खावीत. पुन्हा 8/10 दिवसानंतर हा प्रयोग करून पहावा.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments