Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कॅन्सरनंतरही मातृत्वाला धोका नाही!

Webdunia
शुक्रवार, 19 डिसेंबर 2014 (17:32 IST)
गेल्या काही वर्षात महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. विशेषत: हार्मोनल इम्बॅलन्समुळे तरुण मुलींमध्येही कर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे. अशा महिलांना कर्करोग झाल्यास त्यांचे मातृत्व कायम राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग अभ्यास गटाने (आयबीसीएसजी) महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. टॅमोक्सिफेन व ओव्हेरिन फंक्शन सस्पेन्शन (ओएफएस) या एकत्रित उपचार पध्दतीमुळे हे आता शक्य झाले आहे. 
 
महिलांमध्ये स्तन कर्करोगावरील संशोधनाकरिता जगभरातील 3000 महिलांवर या उपचारपध्दतीची चाचणी घेण्यात आली. यात 90 टक्के  महिलांवर ही चाचणी यशस्वी ठरली आहे. स्तन कर्करोगावर केवळ टेमोक्सिफेन या औषधाबरोबर ओव्हेरिन फंक्शन सस्पेन्शन ही उपचारपध्दती वापरल्यास ती अधिक प्रभावी ठरते असे टाटा रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. वाणी परमार यांनी सांगितले.
 
यामुळे अंडाशयातून निर्माण होणार्‍या इस्ट्रोजेनवर नियंत्रण येऊन पुन्हा स्तन कर्करोग होण्याचा धोका कमी होतो, असे तज्ज्ञ सांगतात. या उपचारपध्दतीत दर महिन्याला पाच वर्षापर्यंत इंजेक्शन देऊन अंडाशाच्या प्रक्रियेवर निंत्रण केले जाते. शिवाय यामुळे अंडाशयावर केमोथेरपी तसेच रेडीएशनमुळे होणारे दुष्परिणाम टाळले जातात व कर्करोगाच्या उपचारानंतरही महिलांचे मातृत्व कायम राहते. तर 35 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांना आपले मातृत्व सुरक्षित राखता येत असल्याचेही यावेळी तज्ज्ञांनी सांगितले.
 
तसेच टॅमोक्सिफेन व ओएफएस या संयुक्त उपचार पध्दतीमुळे पुन्हा कॅन्सर होण्याचा धोकाही 99 टक्क्यांनी कमी होत असल्याचे या  संशोधनात सिध्द झाले आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या व पाच वर्षाच्या उपचारानंतर 88 टक्के महिला स्तनाच्या कर्करोगापासून ठीक झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments