Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणून घ्या रोग संक्रमणाच्या जागा

Webdunia
तुमच्या घरात हानिकारक बॅक्टेरिया आणि जीवजंतू अशा जागी असतात ज्या जागा आपण स्वच्छ समजतो. चला तर त्या जागा कोणत्या हे सर्वप्रथम पाहू या:
 
टूथब्रश: टूथब्रश तुम्ही दिवसातून दोनदा तोंडात घालता पण त्याचबरोबर तोंडात आणि ओलसर टूथब्रशमधील ढीगभर रोगजंतूंची तुम्ही देवाणघेवाण करत असता. कारण बॅक्टेरिया हे ओलसर जागी सर्वप्रथम आणि सर्वाधिक संख्येने वावरत असतात. तुम्ही एक वेळ तोंडातील रोगजंतूपासून वाचाल पण टॉयलेटमधील रोगजंतूपासून वाचू शकणार नाही. अनेकदा टॉयलेट फ्लॅश केल्यानंतर हवेत अगणित बॅक्टेरिया आणि विषारी तत्त्वांनी भरलेले पाण्याचे कण हवेत पसरतात. हे जीवजंतू दोन तासांपर्यंत हवेत पसरलेले असतात आणि ते तिथल्या सर्वच वस्तूंना ज्यांमध्ये टूथब्रशचादेखील समावेश आहे, दूषित करू शकतात. 


 
म्हणूनच तुमचा टूथब्रश टॉयलेटच्या जवळ ठेवू नये. त्याला अशा जागी ठेवा, तिथे तो लवकर कोरडा होईल. वेळोवेळी ब्रश बदला, खास करून आजारातून उठल्यावर. फ्लॅश करण्यापूर्वी कमोडचं झाकणं बंद करायला विसरू नका.

रिमोट कंट्रोल: टीव्हीचा रिमोट कंट्रोल सर्दी-खोकला पसरविण्याचं सर्वात सहज सोपं साधन आहे. दिवसभर तुमच्या रिमोटवर अनेक गोष्टींचा मारा होत असतो. तो जमिनीवर पडतो, सोफा, कुशन्सच्यामध्ये घुसतो, यावर तुम्ही शिंकता वा खोकता, घरातील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती याला हातात घेत असतं. यासाठी तुमचा रिमोट कंट्रोल नियमितपणे ब्लीच वा अल्कोहोलने स्वच्छ करत राहावा.


किचन सिंक: किचन सिंक टॉयलेटपेक्षादेखील अधिक घाणेरडं असू शकतं. भांड्यांमधील खरकटं, भाजीची सालं इत्यादींचा कचरा वा कणीक मळल्यानंतर हात धुतल्याने पडणारे कणकेचे कण इत्यादीमुळे कोळी आणि साल्मोनेलासारखे बॅक्टेरिया वाढण्यास अधिक मदत होते. ते हातांद्वारे अन्नात आणि मग तुमच्या शरीरात पोहोचू शकतात.


 
सिंक हे दिवसातून एकदा तरी ब्लीच आणि पाण्याच्या मिश्रणाने स्वच्छ करावं आणि या सोल्युशनाने पाइपदेखील स्वच्छ करून घ्यावा. सिंक ड्रेन करण्यापूर्वी ड्रेन प्लग लावून तोदेखील स्वच्छ करून घ्यावा.

बाथटब: बाथटब कितीतरी प्रकाराच्या रोगजंतूंनी संक्रमित असतो याची तुम्हाला कल्पनादेखील नसेल. या टबमधील पाण्यापैकी 81 टक्के फंगस, 34 टक्के संक्रमित स्टॅफ बॅक्टेरिया आणि साधारणपणे सर्व प्रकारच्या मळांमध्ये असणारे बॅक्टेरिया आढळतात. या मागचं कारण म्हणजे टबच्या पाइपमध्ये साचलेलं पाणी, ज्यामध्ये हे बॅक्टेरिया वाढत असतात.


 
अंघोळीनंतर बाथटब ब्लीच वा बाथरूम क्लीनरचे स्वच्छ करून घ्या आणि स्वच्छ टॉवेलने पुसून सुकून घ्यावा. वेळोवेळी या पाइपची सफाई करावी.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

Show comments