Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्ही विसराळू आहात का?

प्रा. राजा आकाश

Webdunia
आपणच ठेवलेल्या वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या ते आपल्याला आठवत नाही. आपण ठरवलेली महत्वाची कामं आपल्याला दिवसभर आठवत नाहीत, पण रात्री झोपताना आठवतात. ते इतकं महत्वाचं काम करायला आपण विसरलो म्हणून हळहळत बसतो.

आपल्या स्मरणशक्तीला दोष देतो. अनेक गोष्टी आपल्याला हव्या तेव्हा आठवत नाही म्हणून आपलं बरचं नुकसान होतं व आपण हतबल होत जातो. विज्ञानातीलं संशोधनं असं सांगतात की मानवी मेंदूची क्षमता ही स्नायूंसारखी असते. स्नायू जसे विशिष्ट व्यायाम करून विकसित करता येतात, त्यांची क्षमता वाढवता येते, त्याच पद्धतीने माणसाच्या मेंदूची क्षमतादेखिल विशिष्ठ तंत्र वापरून व सराव करून वाढवता येते.

' वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप' जिंकणारा डॉम्निक ओब्रायन नावाचा ४० वर्षाचा माणूस केवळ ५ मिनिटांमध्ये २४० आकडे अचूक लक्षात ठेवतो व केवळ ४२ सेकंदात ५२ पत्यांचा सिक्वेन्स एकही चूक न करता लक्षात ठेवतो. ओब्रायनला लोक विचारतात की तुझ्यात ही क्षमता कुठून आली तेव्हा तो म्हणतो की ही क्षमता माझ्यात जन्मजात नाही.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणामुळे हे साध्य झाले आहे. जे स्वतःची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात त्यांची स्मरणशक्ती वृद्धावस्थेतही कुशाग्र राहते. १४ वर्षाखालील सुमारे ३२ टक्के मुलांना स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते.

आजच्या काळात सतत माहितीचा ओघ आपल्यापर्यंत येत असताना स्मरणशक्ती वाढविणे या गोष्टीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो आपल्या स्मरणशक्तीचे कौशल्य सिद्ध करतो तो नेहमीच सर्वांच्या पुढे जातो. आपली परिक्षापद्धतही स्मरणशक्तीच्या क्षमतेवर आधारलेली आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रगती जर करायची असेल तर आपल्याला स्मरणशक्ती जास्तीत जास्त वाढवावी लागेल.

प्रा. राजा आकाश
कंसल्टंट सायकॉलॉजिस्ट, नागपूर

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments