Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Blood pressure control डार्क चॉकलेट ने करा ब्लड-प्रेशर कंट्रोल!

Dark Chocolate
, शुक्रवार, 7 जुलै 2023 (11:34 IST)
Blood pressure control with dark chocolate आधीचे लोक हा फुकटचा सल्ला देत होते की चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात, पण आता एका नवीन संशोधनात हे जाहीर झाले आहे की ‘डार्क चॉकलेट’ खाल्ल्याने आमचं डोकं शांत राहून उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
 
डार्क चॉकलेटमध्ये एंटीऑक्सीडेंटस जास्त प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
 
स्वीडनच्या संशोधकाच्या एका दलाने हे सांगितले की ‘डार्क चॉकलेट’ शरीरात त्याचप्रमाणे असर करते जसे रक्तदाबा नियंत्रित करण्यासाठी घेणारी एखादी गोळी.
 
संशोधनात हे ही सांगितले की या प्रकारचे चॉकलेट त्या एंजाइमला बधीत करतात ज्याने रक्तदाब वाढतो.
 
डार्क चॉकलेटमध्ये बऱ्याच मात्रेत ‘कोकोवा’ असतो, ज्यात केटेचींस आणि प्रोसाइनीडाइंस जास्त प्रमाणात असतात, जे रक्तदाबाला प्रभावित करतात.
 
संतुलित आहार आणि धूम्रपानापासून दूर राहून डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदय रोग नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
 
या प्रकारे संशोधनात हे जाहीर झाले आहे की चॉकलेटचे सेवन केल्याने ताण तणाव कमी होण्यास मदत मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल