Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावधान! अॅसिडिटीच्या ‘या’ औषधामुळे तुम्हाला होईल कॅन्सर

Webdunia
बुधवार, 25 सप्टेंबर 2019 (16:09 IST)
तुम्ही अॅसिडिटी झाल्यास कोणती गोळी घेता? प्रसिद्ध रेनिटिडाइन औषध तर घेत नाही ना? घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने अँटी- अॅसिडिटी रेनिटिडाइन औषधावर चेतावणी जारी केली आहे. रेनिटिडाइन औषध घेतल्यास कॅन्सर होण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे.
 
ड्रग कंट्रोलरने म्हंटले कि, रेनिटिडाइनमध्ये अनेक प्रकारचे केमिकल आढळून आले असून त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. रेनिटिडाइनचा वापर केवळ अॅसिडिटीसाठीच नव्हेतर आतड्यांमध्ये होणार अल्सर, गैस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स बीमार, इसोफैगिटिस यासाठीही करण्यात येतो. हे औषध मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारात आणि इंजेक्शनमध्ये उपलब्ध आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आरोग्य सेवा महासंचालनालयाचे व्हीजी सोमाणी यांनी देशभरात रेनिटिडाइनवरून चेतावणी जारी केली आहे. आणि राज्यांना याविरोधात तातडीने पावले उचलण्यास सांगितले आहे.
  
दरम्यान, अमेरिकेच्या एफडीएने रेनिटिडाइनमुळे कॅन्सर होण्याचा धोका असल्याचा सर्वप्रथम दावा केला होता. आणि याविषयी अलर्टही जारी केला होता. भारतात या औषधाचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना त्वरित उत्पादन घेण्यास बंदी केली आहे. तसेच डॉक्टारांनाही रेनिटिडाइन औषध रुग्णांना देण्यास मनाई केली आहे.
 
भारतातील औषधांची गुणवत्ता, सुरक्षा यावर नियंत्रण ठेवणारी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने रेनिटिडाइनशी संबंधित रिपोर्ट विषय तज्ञ समितीकडे पाठविला आहे. ही समिती देशभरात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या नावाने विकल्या जाणाऱ्या  रेनिटिडाइन औषधाची चौकशी करेल.

संबंधित माहिती

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments