suvichar

भारतीयांमध्ये वाढताय हृदयाच्या समस्या

Webdunia
बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (15:30 IST)
डॉ बिपीनचंद्र भामरे, मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन
 
Heart problem
Heart problems on the rise in Indians देशात हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. हृदयाच्या वाढत्या समस्यांमागील कारणे कोणती हे या लेखाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य जीवनशैलीचे पालन करणे आणि आपल्या हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे.
 
 25-70 वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्रासपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या वाढत असल्याचे दिसून येते. दुर्लक्ष केल्यामुळे किंवा जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांना जीव गमावत आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक घटक हृदयाच्या समस्यांचा धोका वाढवू शकतात.त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली आणि वेळीच प्रतिबंध केल्यास ऱ्हदयविकाराच्या समस्या टाळता येऊ शकतात.
 
चूकीची जीवनशैली निवडणे हे भारतीयांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगास कारणीभूत ठरते.  चूकीचा आहार, वाढता ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या वाईट सवयींमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त अनुवांशिकता, वैद्यकिय इतिहास आणि जन्मतः वजन कमी असणे हे देखील हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरते. यामुळे हृदयविकाराचा झटका येणे आणि हृदयविकाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. एखाद्याच्या आहारामध्ये कर्बोदकांचा प्रमाण अधिक असणे, ज्यामुळे ओटीपोटात जास्त चरबी जमा होते आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी चिंतेची बाब ठरु शकते. ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्ती हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात. आहाराचा विचार करताना, आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास धोका असतो. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन हे उच्च रक्तदाबामागचे मुख्य कारणे आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कामाच्या व्यापामुळे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण वाढते आहे, शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी झाले आहे, परिणामी एकूण फिटनेस पातळी कमी झाली आहे.
 
तुमच्या हृदयाच्या आरोग्याचे रक्षण कसे कराल
एखाद्याचे वय काहीही असो, हृदयविकाराची समस्या उद्भविण्या केवळ वय कारणीभूत नसते. जीवनशैली निवडी, आहाराच्या सवयी, व्यायाम पद्धती आणि तणाव व्यवस्थापन तंत्र यासारखे विविध घटक एखाद्याचा आरोग्यावर लक्षणीय परिणाम करतात. तुमच्या हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही नियमित हृदय तपासणीसाठी करणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा पातळी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी त्यासंबंधीत औषधं वगळू नका. नियमित आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा. तुमच्या हृदयावर ताण येणारी कोणतीही कठोर परिश्रम करणे टाळा. दम लागणे, जास्त घाम येणे किंवा छातीत दुखणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या हृदयाचे आरोग्य हे तुमचे प्रथम प्राधान्य असले पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Kick Day 2026: नात्यातील नकारात्मकता घालवण्याचा दिवस म्हणजे किक डे

Moong Dal Chilla पौष्टिक आणि चविष्ट मुगाच्या डाळीचे धिरडे

गॅसच्या समस्येवर हे सोपे उपाय अवलंबवा

फूड इन्स्पेक्टर बनून करिअर करा

केसांना घनदाट करण्यासाठी दालचिनीचा वापर करा

पुढील लेख
Show comments