Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदबत्ती, धूपचा धूर सिगारेट पेक्षाही धोकादायक

Webdunia
आपल्याकडे वातावरण आणि मन प्रसन्न करण्यासाठी  देवपूजेसाठी घरात आणि मंदिरात अगरबत्त्यांचा वापर केला जातो.  पण, अगरबत्ती आणि धूपचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक असतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
 
अगरबत्त्यांच्या धुराने हृदयाशी संबंधित आजार, डोकेदुखी आणि कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात झालेल्या या संशोधनात दोन प्रकारच्या अगरबत्त्यांवर अभ्यास करण्यात आला. या दोन्ही प्रकारच्या अगरबत्त्या ९६ टक्के लोकांच्या घरी वापरण्यात येतात. तीन तासांपर्यंत एका खोलीत या अगरबत्त्या जाळल्या गेल्या आणि २४ तासांसाठी त्या बंद खोलीत मानवी फुफ्फुसांच्या पेशी ठेवण्यात आल्या. अगरबत्त्यांच्या धुरामध्ये असणाऱ्या कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होत असल्याचे दिसले. सिगारेटच्या धुरामुळेही अगदी असाच परिणाम होताना पाहायला मिळतो.
 
त्याचप्रमाणे अगरबत्ती व धूपाच्या धुरात ९९ टक्के अतिसूक्ष्मकण असतात. हे सूक्ष्मकण हवेत मिसळतात आणि श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन तिथेच अडकतात. शरीरातील जिवंत पेशींना हे कण धोका पोहोचवतात. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सिगारेटच्या धुराच्या तुलनेत खूपच अधिक असते, असा अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments