rashifal-2026

घरी देखील ऑफिसमधील ताण येतो का?

Webdunia
बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (00:34 IST)
आजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना अगदी दमछाक होते. ऑफिसमधील कामाचा ताण, वातावरण याचा नक्कीच  आपल्यावर परिणाम होत असतो. तर कौटुंबिक ताण, वाद याचा परिणाम कामावर झालेला दिसून येतो. 
 
पण हे दोन्हीही ताण एकमेकांपासून वेगवेगळे कसे ठेवावे, हे माहीत असायला हवे. पण अनेकांना ते जमत नाही. मग ऑफिसमधून घरी गेल्यावरही ऑफिसमधील टेंशन्स डोक्याभोवती फे धरू लागतात. दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये काय होईल याची चिंता सतावू लागते. पण या काही टिप्सने तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील ताळमेळ योग्य प्रकारे साधू शकता.
 
* सर्वात आधी एक मर्यादा आखून घ्या. स्पर्धा सोपी नसली तरी ऑफिसचे काम घरी नेऊन करु नका. यामुळे तुमचा वर्क लाइफ बॅलन्स बिघडेल. तसेच ऑफिसचे काम घरी आणल्याने त्यासोबत टेन्शनही येणारच. परिणामी पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होणार. म्हणून शक्यतो ऑफिस काम ऑफिसमध्ये संपवा. 
 
* ऑफिसमधून निघाल्यावर आपल्याला काय काय काम करायचे आहे, याचा विचार करा आणि त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशीची योजना आखा. त्यामुळे घरी जाऊन कामाचा ताण जाणवणार नाही. 
 
* वेळेचे नियोजन नीट करा. तुमच्या क्षमतेनुसार ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला ताण येणार नाही. अनेकदा काम वेळेत पूर्ण न झाल्याने ताण येतो. तर काम टाळण्याच्या सवयीमुळे काम अधिक वाढते. त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे. 
 
* ऑफिसमध्ये असताना सोशल मीडियापासून दूर राहा. कारण यात किती वेळ जातो, याचा अंदाज लागत नाही. त्याचबरोबर त्याचा परिणाम कामावरही होतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना सोशल मीडियाचा वापरटाळा. 
 
* मॅनेजर किंवा बॉसने एक्सट्रा काम दिल्यास ते करणे शक्य नसल्यास स्पष्ट नकार द्या. कारण यामुळे कदाचित तुमच्या करिअरवर चांगला परिणाम होईल, पण त्यामुळे तुम्ही कामात अधिक गुंग होता. टेन्शन वाढते आणि पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होतो.
- जयश्री काळे 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

Jobs: प्रसार भारतीमध्ये एमबीएसाठी भरती; या तारखेपर्यंत अर्ज भरा

गडद त्वचेच्या टोनसाठी सर्वोत्तम आहे हे नेलपॉलिश रंग

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments