Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी

Webdunia
रविवार, 20 जानेवारी 2019 (00:42 IST)
उपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही ठोस पावलेही उचलायला हवीत. डॉक्सअॅप मेडिकल अॅपच्या वैद्यकीय ऑपरेशन्स प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी यांनी कुटुंबाचे आरोग्य चांगले राखण्यात उपयुक्त ठरतील अशा ८ टिप्स दिल्या आहेत.
 
संपूर्ण आरोग्य तपासणी
 
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी शेवटची संपूर्ण आरोग्य तपासणी कधी करून घेतली होती? याचे उत्तर सहा महिन्यांहून अधिक काळ असेल, तर आता पुन्हा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे. यातील महत्वाचा भाग असा की, एखाद्या व्यक्तीला कितीही निरोगी वाटत असले, तरी कोलेस्टरॉल, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेची पातळी आणि पांढऱ्या पेशींची संख्या अशा नियमित आरोग्यविषयक निदानात्मक चाचण्या केल्या तर त्यातून चिंताजनक बाबी लवकर लक्षात येऊ शकतात. या लक्षणांचे रूपांतर प्रत्यक्ष आजारात होण्यापूर्वीच तुम्हाला त्यांच्याबद्दल कळू शकते.
 
नियमित औषधे
 
तुम्हाला थायरॉइडची कमतरता, उच्च/कमी रक्तदाब किंवा कॅल्शिअम/लोहाची कमतरता असे काही असेल, तर तुम्हाला त्यांची पूरके नियमित घ्यावी लागतात. घेतलेल्या औषधांची नोंद ठेवणे, डोस घेण्यास न विसरणे आणि ही औषधे नियमितपणे दुकानातून न चुकता घेऊन येणे हेही खूप त्रासदायक होऊ शकते. यात तंत्रज्ञान तुमच्या मदतीला येऊ शकते- तुमचा व किंवा तुमच्या घरातील कोणाचा औषधाचा डोस चुकू नये यासाठी स्मार्टफोन दररोज रिमाइंडर लावून ठेवा. औषधे संपण्याची वेळ येईल त्या दरम्यान कॅलेंडर रिमाइंडर लावून ठेवा. तुम्ही औषधे घरपोच देणाऱ्या सेवाही वापरू शकता. ते खूप सोयीस्कर ठरू शकते.
 
मानसिक आरोग्यविषयक सहाय्य
 
व्यक्तीच्या शरीर आणि स्वास्थ्याबद्दल जागरूकता वाढत असतानाच, मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल समाजात अद्याप खूप गैरसमज आहेत, जागरूकतेच्या अभावामुळे या विकारांचे निदानच होत नाही आणि याबद्दल समाजात अवघडलेपण आहे. मानसिक विकारांना तोंड देणाऱ्या व्यक्तींसाठी मनोविकारतज्ज्ञांना भेटणे गैरसोयीचे तसेच कठीण आहे. तुम्हाला वा तुमच्या कुटुंबियांना मनोविकारतज्ज्ञ किंवा थेरपिस्टशी जोडून देणारे तंत्रज्ञानाधारित मार्ग म्हणजे फोन किंवा कम्प्युटर. तुमच्या कुटुंबाला आवश्यक असे मानसिक आरोग्यविषयक सहाय्य या मार्गांनी मिळू शकते.
लैंगिक आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता
 
मानसिक आरोग्याप्रमाणेच लैंगिक बाबी हाही वर्ज्य विषय आहे. लैंगिक बाबी आणि त्यांतून निर्माण निगडित आरोग्याच्या समस्यांबद्दलची संभाषणे नेहमीच दडपून टाकली जातात. लैंगिक आरोग्याशी निगडित समस्यांबद्दल आणि त्या कशा हाताळाव्या याबद्दल तुमच्या कुटुंबियांना जागरूक करणे अत्यावश्यक आहे. मात्र, या विषयांचे स्वरूप संवेदनशील असल्याने यासंदर्भात तज्ज्ञांना दाखवणे लोकांना अवघड वाटते. अॅप्स, अनेक आरोग्यविषयक नेटवर्क्स आणि तंत्रज्ञानांच्या माध्यमातून लोक आता गाजावाजा न होता सोयीस्करपणे त्यांच्या लैंगिक आरोग्य व स्वच्छता (हायजिन) यांबद्दलच्या अत्यंत व्यक्तिगत व खासगी प्रश्नांची उत्तरे भारतातील सर्वोत्तम तज्ज्ञांकडून मिळवू शकतात.
 
आहार व्यवस्थापन
 
काही समजुती अत्यंत ठोकळेबाज असल्या तरी सत्य असतात. तुम्हा खाता तसे होता ही त्यातलीच एक. आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन व आरोग्यविषयक परिस्थिती व गरजा लक्षात घेऊन अन्नाची निवड करणे व त्यानुसार किराणा सामान खरेदी करणे हे तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहार निश्चित करण्यात व प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य सुधारण्यात उपयुक्त ठरू शकते.
 
कुटुंब नियोजन
 
तुम्हाला तुमचे कुटुंब वाढवायची इच्छा आहे की नाही हा मुद्दा वेगळा पण पूर्वनियोजन असेल तर तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील आणि या प्रक्रियेत तुम्ही निरोगी राहाल याची खातरजमा होते. दुर्दैवाने सामाजिक दबाव आणि काही प्रसूतीतज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ज्ञांच्या (ऑब/गाइन्स) टीकात्मक भूमिकेमुळे स्त्रियांना त्यांनी घेतलेल्या अपॉइंटमेंट्सचा फेरविचार करायला भाग पडलेले आहे. अशा अपॉइंटमेंट्स टाळण्यापेक्षा ऑब/गाइन निवडण्यासाठी तुम्ही इंटरनेट व हेल्थ अॅप्सचा वापर करून तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्यांच्या प्रतिक्रिया बघून तुमच्या गरजा समजून घेणारे व चांगले डॉक्टर शोधू शकता.
 
प्राथमिक स्व-मूल्यांकन
 
बरे नसल्याची भावना किंवा काहीतरी चुकत आहे अशी भावना हा कोणत्याही गंभीर समस्येचा पहिला निदर्शक असू शकतो. उदाहरणार्थ, मधुमेह, हृदयविकार, नैराश्य आणि असे अनेक. तुम्हाला ज्या क्षणी अशी भावना येईल, त्या क्षणी लगेच डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. नवीन कार्यात्मक रचना भारतात टेलिमेडिसिन घेऊन येत आहे. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून डॉक्टरांशी बोलू शकाल किंवा अगदी व्हिडिओ कॉलही करू शकाल आणि तुमच्या समस्येबाबत पटकन सल्ला घेऊ शकाल. तुम्हाला तुमच्या स्वत:च्या किंवा कुटुंबियांपैकी कोणाच्या स्वास्थ्याबद्दल मन:शांती मिळवून देण्यात हे खूपच उपयुक्त ठरू शकते.
 
सेकंड ओपिनियन घेणे
 
निदान खूपच सकारात्मक असेल, तरीही तुम्हाला वाटणाऱ्या सुटकेच्या भावनेच्या तळाशी चिंतेची पाल चुकचुकत असते. जर ते खूपच वाईट असेल, तर तुम्हाला ते स्वीकारणे जड जाते. काहीही म्हणा जेव्हा तुमच्या आरोग्याचा प्रश्न असतो तेव्हा कोणताच धोका पत्करू नका. तुमच्या मनात शंकेची पाल थोडी तरी चुकचुकत असेल तरी किंवा आजाराची अवस्था खूप गंभीर असली तरी तुम्ही सेकंड ओपिनियन घेतलाच पाहिजे. आता तंत्रज्ञानामुळे तुम्हाला जगातील सर्वांत अनुभवी व मान्यताप्राप्त तज्ज्ञांशी संपर्क साधणे शक्य आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या मदतीने आरोग्यसेवेची द्वारे तुमच्यासाठी खुली होऊ शकतात आणि तुमच्या तसेच कुटुंबियांच्या आरोग्याबाबत निश्चिंत होण्यासाठी तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Sunday Special Recipe : फ्राइड चिकन पॉपकॉर्न

आपल्या शरीरासाठी प्रोटीन किती महत्वाचे आहे की नाही?

जर तुम्ही पहिल्यांदाच केसांना रंग देणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

सकाळी उठल्याबरोबर तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो का? ही कारणे असू शकतात

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

पुढील लेख
Show comments