Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाढत्या वयासोबत घटतो महिलांचा तणाव : सर्वेक्षण

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2019 (12:27 IST)
महिलांचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्यांना जास्त तणावमुकत झाल्यासारखे वाटू लागते. एखादी महिला प्रौढावस्थेत प्रवेश करते, तेव्हा तिला आपला तणाव हलका झाल्यासारखे वाटते आणि जीवनाचा अधिक आनंद घेत ते ती चांगल्याप्रकारे जगते. 
 
एका अध्ययनातून हा खुलासा झाला आहे. याआधीच्या अध्ययनांमध्ये प्रौढावस्थेत महिला जास्त तणाव व नैराश्यात असतात, असे म्हटले होते. त्याला या अध्ययनामुळे छेद मिळाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, तणावाचा संबंध आत्मविश्वास आणि आत्मनियंत्रणाच्या क्षमतेशी असतो. असे समजले जाते की, बहुतांश महिलांमध्ये वाढत्या वयासोबत हे गुण कमी होतो. 
 
दुसरीकडे काही प्रौढावस्था महिलांसाठी असंतुष्ट राहण्याचा कालावधी असतो, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. या नव्या अध्ययनातून वयाच्या या टप्प्यावर महिला कमी तणावाचे व आनंदित जीवन जगतात, असे समोर आले आहे. या अध्ययनाचे प्रुखम एलिझाबेथ हेडगेन यांच्या माहितीनुसार, ज्यावेळी महिला प्रौढावस्थेत पोहोचतात, तेव्हा त्यांच्या तणावाची पातळी कमी होते. बहुधा यामुळेच जीवनात तणाव आपोआप कमी होतो किंवा मग वयासोबत त्याची त्यांना सवय होते. दुसरे कारण असेही असू शकते की, जीवनाच्या सुरुवातीस काही गोष्टी जेवढ्या अडसर ठरतात, तेवढ्या नंतर वाटत नाहीत, असे एलिझाबेथ यांनी सांगतिले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

पुढील लेख
Show comments