Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागतिक सफरचंद खाण्याचा दिवस विशेष 2021 :दररोज सफरचंद खा ,आजाराला पळवा

Webdunia
शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (16:19 IST)
गडद लालरंगाचे आंबट गोड चवीचे हे फळ आरोग्यासाठी अत्यन्त फायदेशीर आहे.हे वेगवेगळ्या आजारासाठी लाभदायी आहे.याचे वैज्ञानिक नाव मेलस डोमेस्टिका आहे.हजारो वर्षांपासून हे आशिया आणि युरोप मध्ये उगवतात.भारतात उत्तरीप्रदेशातील हिमाचल येथे याची लागवड केली जाते.या मध्ये अनेक व्हिटॅमिन्स आढळतात.
 
सफरचंदाला सर्वप्रथम सिकंदर महान याने शोधले.ते मध्य आशिया मध्ये आले असता त्यांनी या फळाची माहिती काढली.युरोपात या फळाची अनेक प्रजाती आहेत.युरोपात या फळाला देवाने दिलेलं बक्षीस मानले जाते. 
 
सफरचंद खाण्याचे फायदे-
या फळामध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.हे शरीराला पोषण देतात.शरीराला आजारापासून दूर ठेवतात.यामुळे रक्त वाढते. चेहरा तजेल करतो,हृदयासाठी सफरचंद खूपच फायदेशीर आहे.चला याच्या फायद्याविषयी जाणून घेऊ या
 
1.ऍनिमिया दूर होते-ऍनिमिया मुळे माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता होते आणि शरीरात रक्त बनत नाही. हिमोग्लोबिन पण कमी होते. सफरचंदात आयरन मुबलक प्रमाणात आढळते.ज्या मुळे शरीरात हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.जर दररोज सफरचंद खाऊ शकत नसाल तर आठवड्यातून एकदा तरी ते खाणे महत्त्वाचे आहे.
 
2.चेहरा तजेल करते- जर चेहऱ्यावर डाग असल्यास चेहऱ्याला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी दररोज एक सफरचंदाचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.काही दिवसात फरक दिसेल.
 
3 हृदयाचे आजार दूर करण्यात मदत होते-सफरचंद हृदयासाठी ही खूप फायदेमंद आहे.हार्ट मध्ये ऑक्सिडेशन मुळे होणारा धोका कमी होतो.हे शरीरात कॉलेस्ट्रॉल चे प्रमाण नियंत्रित करते तसेच हे शुगर चे प्रमाण ही कमी करते. हार्ट (ह्रदयात)मध्ये रक्ताचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात ही सफरचंद खूप फायदेमंद आहे.
 
4.वजन कमी करण्यात सहायक-जर आपले वजन लवकर वाढत आहे आणि आपल्याला  काही उपाय सापडत नाही तर आपण दररोज 2 सफरचंदाचे सेवन करायला सुरुवात केली पाहिजे ज्या मुळे आपले वाढते वजन कमी होईल हे वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झाले आहे. 
 
5 मेंदू ला व्यवस्थित ठेवण्यासाठी-सफरचंदाचे नियमित सेवन केल्यामुळे अल्जाइमर रोग होण्याची शक्यता कमी होते आणि स्मरणशक्ती पण चांगली राहते.हे ब्रेन च्या सेल निरोगी ठेवतात आणि मेंदूत रक्ताचा पुरवठा सुरळीत करतात. 
 
6.लिव्हर ला स्वच्छ करतो-सफरचंदात अनेक प्रकार चे व्हिटॅमिन्स असतात यामुळे लिव्हर ची घाण स्वच्छ होते.दररोज सफरचंद खालल्याने पाचन व्यवस्थित होते आणि  शरीरात रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे सुरु असतो.
 
7.किडनी स्टोन ची शक्यता कमी होते-सफरचंदात साइडर विनिजर नावाचे तत्व आढळतात. हे किडनीत होणाऱ्या स्टोन ची शक्यता कमी करतो.ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी आवर्जून सफरचंदाचे सेवन करावे. 
 
8.इम्यून सिस्टम ला मजबूत बनवते-सफरचंद इम्यून सिस्टम ला मजबूत बनवते है वैज्ञानिक संशोधनानुसार सिद्ध झाले आहे.सफरचंद शरीरात असणाऱ्या बैक्टिरिया चा नाश करतो. सफरचंदात रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचा गुण आहे.
 
9 डोळ्याची दृष्टी वाढवण्यात मदतगार-सफरचंदात विटामिन ए मुबलक प्रमाणात आढळते. या मुळे डोळ्याची दृष्टी वाढविण्यासाठी मदत मिळते.ज्या लोकांची दृष्टी कमकुवत आहे किंवा ज्यांना चष्मा लागला आहे त्यांनी नियमितपणे सफरचंदाचे सेवन करावे. 
 
 
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments