Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Cancer Dayजागतिक कॅन्सर दिन: सर्वाधिक आढळणारे कॅन्सर कोणते, त्यांची लक्षणं काय आहेत

Webdunia
शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (19:01 IST)
सुशीला सिंह
भारतातील प्रत्येक 9 जणांपैकी एका व्यक्तीला कॅन्सर होण्याचा धोका आहे. मग तो पुरुष असो वा महिला. ही गोष्ट इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज अॅंड इंफरमॅटिक्स अॅंड (NCDIR) च्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
 
गेल्या वर्षी लोकसभेत तृणमूल काँग्रेस पार्टीच्या खासदार नुसरत जहाँ यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्यांना प्रश्न विचारला होता की, देशात कॅन्सर रुग्णांची संख्या किती आहे आणि त्यामुळे किती मृत्यू झाले.
 
याला उत्तर देताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं होतं की, 2022 मध्ये कॅन्सरचे रुग्ण 14,61,427 होते.
 
ही संख्या 2021 मध्ये 14,26447 इतकी होती तर 2020 मध्ये भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या 13,92,179 एवढी होती.
 
डॉक्टर काय म्हणतात?
डॉक्टरांचे म्हणणे आहे की काही कॅन्सर असे असतात की ज्यांच्याबाबत सुरुवातीच्याच टप्प्यात आपल्याला माहिती होते. पण अनेक कॅन्सर हे 'सायलेंट' असतात. ज्यांच्याबाबत शेवटच्या टप्प्यात माहिती होते.
 
WHO आणि ग्लोबोकॅनच्या 2020 च्या डेटानुसार महिलांमध्ये स्तन, सर्व्हाइकल, गर्भाशय, अंडाशय, लिप, ओरल कॅव्हिटी आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण आढळले आहे. तर पुरुषांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये लिप, ओरल कॅव्हिटी, फुप्फुसांचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर आणि आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण आढळले आहे. त्याबरोबरच अन्ननलिकेचा कॅन्सर देखील पुरुषांमध्ये आढळल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
 
ग्लोबोकॅन 2020, मध्ये सांगण्यात आले आहे की 185 देशात 36 प्रकारचे कॅन्सर आढळले आहेत. ग्लोबोकॅन ही कंपनी कॅन्सरग्रस्तांसंबंधी डेटाबेस गोळा करणारी कंपनी आहे.
 
महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारे कॅन्सर
1. ब्रेस्ट किंवा स्तनाचा कॅन्सर
कॅन्सरतज्ज्ञांचे म्हणणे आहे की तरुण मुलींमध्ये देखील आता स्तनाच्या कॅन्सरची प्रकरणं समोर येत आहेत. स्त्री रोग आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ. स्वस्त सांगतात की स्तनांचा कॅन्सर अनुवांशिक असतो. जर आई किंवा आजी यांना कॅन्सर असेल तर ते जीन्स पुढील पिढीत येण्याची शक्यता असते.
 
भारतात या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून जागरुकता मोहीम चालवली जात आहे. महिलांनी घरच्या घरी कॅन्सरची तपासणी कशी करावी या गोष्टीचा देखील यात समावेश आहे.
 
घरच्या घरी कशी करावी कॅन्सरची तपासणी
 
18 वर्षांपुढील मुलगी ही चाचणी करू शकते.
 
मासिक पाळी झाल्यानंतर आपल्या चार बोटांनी स्तनांमध्ये गाठ आहे की नाही हे तपासावे आणि काखेतही दाबून गाठ आहे की नाही हे तपासावे.
स्तनाग्रांना दाबून पाहावे की त्यातून काही स्राव तर निघत नाहीये ना.
जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात स्तनांचा कर्करोग आढळला असेल, ज्यात आईला 35 व्या वर्षीच ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे तर अशा स्थितीत मुलीची तपासणी ही पाच सहा वर्षांआधीपासूनच सुरू केली जाते.
प्रत्येक महिलेनी आपली 40 ओलांडल्यानंतर मेमोग्राफी करणे आवश्यक आहे.
जर संशयास्पद काही आढळले तर तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
 
2. सर्विकल कॅन्सर किंवा गर्भाभय मुखाचा कर्करोग
 
स्तनांच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा सर्वाधिक आढळतो. या कॅन्सरचे कारण ह्युमन पेपीलोमा व्हायरस हे आहे. आणि तज्ज्ञ सांगतात की या कॅन्सरवर 100 टक्के आळा घातला जाऊ शकतो.
 
लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला थांबवण्यासाठी एचपीव्ही व्हायरसच्या लसीकरणाला युनिव्हर्सल इम्युनायजेशन मोहिमेत सामील करुन घेण्याची शिफारस केली आहे.
 
यात म्हटले आहे की 9 ते 14 वर्षं वयोगटातील मुलींना या व्हायरसची लस देण्यात येणे आवश्यक आहे.
 
सुरुवातीला या कॅन्सरची लक्षणं आढळत नाहीत पण जर पुसटशीही लक्षणं आढळली तर त्याला गांभीर्याने घ्यायला हवे.
 
या व्हायरसला कॅन्सरमध्ये रुपातंरित होण्यास बराच काळ लागतो. पेपस्मिअर टेस्टद्वारे याचे निदान होऊ शकते.
 
3. ओव्हेरियन किंवा अंडाशयाचा कॅन्सर
हा कॅन्सर तर शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे थेट तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आल्यावरच समजतो. त्यामुळे या कॅन्सरला सायलेंट कॅन्सरदेखील म्हटलं जातं.
 
डॉ. स्वस्ती सांगतात की या कॅन्सरमध्ये कॅन्सरची कोणती लक्षणं आढळत नाही. साधारणतः महिलांचे पोट फुगणे, भूक न लागणे, उलट्या होणे, गॅस पास न होणे किंवा शौचास गेल्यावर त्रास होने इत्यादी त्रास होतो. अशी समस्या महिलांना केवळ एका महिन्यासाठी होते पण ही लक्षणं आढळल्यास तो अंडाशयाचा कर्करोग असू शकतो.
 
स्वस्ती पुढे सांगतात, जेव्हा डॉक्टर अशा महिलांच्या मेडिकल हिस्ट्रीबाबत जाणून घेतात तेव्हा असं कळतं की या महिलांची भूक कमी झाली आहे. त्या दोन चपात्यांऐवजी एक चपाती खात आहेत. त्यांना जास्त पचत देखील नाहीये आणि त्यामुळे त्या घरच्या घरीच छोटे मोठे उपचार करत आहेत.
 
त्यावर स्वस्ती असा सल्ला देतात की महिलांनी दरवर्षी अल्ट्रासाउंड टेस्ट करून घ्यायला हवी. जेणेकरून त्यांना हे समजेल की त्यांच्या अंडाशयात सिस्ट आहेत की नाही आणि उपचार वेळेवर सुरू करता येतील.
 
या व्यतिरिक्त महिलांमध्ये लिप, ओरल कॅव्हिटी आणि कोलोरेक्टम म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कॅन्सर आढळून येतो. हे कर्करोग पुरुषांमध्ये देखील आढळतात.
 
पुरुषांमध्ये आढळणारे कॅन्सर
1. लिप, ओरल, कॅव्हिटी आणि तोंडाचा कॅन्सर
 
हेड-नेक सर्जन आणि ऑंकोलॉजिस्ट डॉ. सौरभ अरोरा सांगतात की लिप आणि ओरल कॅव्हिटी कॅन्सरचे प्रमाण 90 टक्के त्या लोकांमध्ये आढळते जे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.
 
डॉक्टरांचे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या कॅन्सरचे प्रमुख कारण कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन आणि दारू हे आहे.
 
हा कॅन्सर तोंडाच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी होतो. जसं की गाल, जीभ, जिभेचा खालचा भाग, टाळू या ठिकाणी. त्या ठिकाणी अल्सर किंवा पुरळ येतात जे औषधोपचारानंतरही ठीक होत नाही.
 
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राशी अग्रवाल सांगतात की जर तुमच्या जीभेला काही जखम झाली किंवा दाताने जिभेला जखम झाली तर औषधी घेतल्यानंतरही जर तीन आठवड्यानंतरही ते पूर्ववत झाल नाही तर ही चिंतेची बाब असू शकते. तसेच अनेकदा असंही होतं की दात सैल होऊन पडतो. त्या ठिकाणी जखम होते.
 
पुढे डॉ. अरोरा सांगतात की या व्यतिरिक्त तोंडात काही ग्रोथ आढळली तर ती कॅन्सरची असेल असे नाही पण ती तपासून घेतली पाहिजे. सोबतच जबडा पूर्णपणे उघडता येत नाही. हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.
 
या व्यतिरिक्त जेव्हा स्थिती गंभीर होते तेव्हा जखमेतून रक्तस्राव होतो, आवाजात बदल होतो, वेदनेमुळे जेवण जात नाही आणि त्यामुळे वजन कमी होतं.
 
जर ही लक्षणं आढळली आणि तीन आठवड्यांहून अधिक काळ औषधोपचार घेऊन देखील जर बरं वाटलं नाही तर डॉक्टराचा सल्ला घ्यायला हवा.
 
2. फुफ्फसांचा कॅन्सर
 
डॉक्टरांचे म्हणणं आहे की या कॅन्सरला लोक टीबी या आजाराशी देखील जोडतात कारण यामध्ये रुग्णाला खोकल्याची तक्रार देखील असते.
 
पण जर ही सारे लक्षणं तीन आठवड्यांहून अधिक काळ राहिली आणि औषधोपचारानंतर जर परिणाम जाणवला नाही तर डॉक्टर बायोप्सीचा सल्ला देतात. याला घाबरू नये असं डॉक्टरांनी सांगितलं.
 
धूम्रपान हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे मुख्य कारण आहे पण अलीकडील काळात प्रदुषणामुळे देखील हा कॅन्सर होत असल्याचे दिसून आले आहे. हा कॅन्सर तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत असल्यावरच लक्षात येतो.
 
3. इसोफॅगस किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर
 
डॉक्टरांनुसार हा कॅन्सर वयाची पन्नाशी गाठल्यानंतरच या कॅन्सरबद्दल समजतं. या कॅन्सरमुळे अन्न गिळताना त्रास होतो मग काही पिताना देखील त्रास होऊ शकतो.
 
सातत्याने अॅसिडिटीची तक्रार ज्या लोकांमध्ये असते किंवा सातत्याने तोंड आंबट पडण्याची लक्षणं ज्यांच्यात आढळतात त्या लोकांत कॅन्सरचं प्रमाण आढळतं.
 
या व्यतिरिक्त ही लक्षणं आढळतात.
 
पचनाची समस्या
छातीत जळजळ होणे
काही अडकल्यासारखे वाटणे
डॉक्टरांच्या मते जे लोक स्थूल असतात, दारू पितात आणि धुम्रपान करतात त्या लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
 
4. कोलोरेक्टल किंवा मोठ्या आतड्यांचा कॅन्सर
 
डॉ. राशी अग्रवाल सांगतात की या कॅन्सरमुळे शरीरात रक्ताची कमी जाणवते.
 
साधारणतः ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिन 12-15 ग्राम डेसीलीटर असावे आणि पुरुषांमध्ये 13.5 ते 17.5 ग्राम डेसीलीटर असावे.
 
डॉक्टरांचे म्हणणे आहे की हा कॅन्सर झाला की हिमोग्लोबिनची पातळी खालावून एनिमियाचा त्रास होऊ शकतो. तसेच रक्ताची उलटी देखील होऊ शकते.
 
डॉ. अभिमन्यू कपूर सांगतात की जर ट्युमर झाला तर शौचाच्या वेळी रक्त येऊ शकतो, काळ्या रंगाची विष्ठा येते, बद्धकोष्ठ किंवा अतिसार होणे ही लक्षणं आढळतात.
 
या व्यतिरिक्त ही लक्षणं आढळतात
 
गॅस होणं
पोट फुगणे
पोटात पाणी होणे
पोटातील वेदना गंभीर स्वरूपाच्या झाल्या तर गाठी तयार होऊ शकतात.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की हा कॅन्सर वाढत्या वयात होतो आणि याची कारणं अद्याप माहीत नाहीत.
 
पण जर कुटुंबात फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजेच आई, वडील, सख्खा भाऊ किंवा बहीण यांना हा कॅन्सर झाला असेल तर त्या लोकांनाही हा कॅन्सर होण्याचा धोका असतो.
Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

पुढील लेख
Show comments