Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमचे कंप्यूटर निर्माण करित आहे गंभीर आजार, वेळेवर करा उपचार

तुमचे कंप्यूटर निर्माण करित आहे गंभीर आजार, वेळेवर करा उपचार
, मंगळवार, 19 मार्च 2024 (22:00 IST)
आजच्या काळात आपल्याला नेहमी कंप्यूटरच्या माध्यमातून घडणाऱ्या अपराधांची माहिती मिळते आपल्या कंप्यूटरच्या सुरक्षासाठी आपण चांगल्या प्रकारे बंदोबस्त करतो. जसेकि फायरवॉलची सेटिंग बदलणे किंवा अँटी वायरस बदलणे इतर. पण हा विचार कधी तुमच्या मनात आला का, की कंप्यूटर वर जास्त काम केल्याने किती जास्त दुष्परिणाम आरोग्यावर होतात. जे लोक जास्त वेळ कंप्यूटरच्या समोर बसतात. त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पाठीचे दुखणे, डोळे दुखणे किंवा जे लोक की-बोर्डचा अधिक उपयोग करतात, त्यांचे हात दुखणे ही सामान्य गोष्ट आहे. या समस्यांना साधारण समस्या म्हणून दुर्लक्षित करतात. पण पुढे जावून हे साधारण दुखणे मोठे दुखणे बनते. या आजाराला रिपिटेटिव स्ट्रेस सिंड्रोम बोलले जाते. या सिंड्रोममध्ये टेंडोनाइटिस आणि कार्पल टनल सिंड्रोम सहभागी आहे. टेंडोनाइटिस सिंड्रोम मध्ये टेंडन्स वर सारखा जोर पडल्यामुळे ते जळून जातात. कार्पल टनल सिंड्रोममध्ये नसांवर परिणाम होतो. जे हाताच्या बोटांना जोडतात. 
 
अजुन पर्यंत वैज्ञानिक दृष्टीने या गोष्टीचे निवारण झाले नाही आहे की कम्प्यूटर मधून उत्पन्न होणाऱ्या रेडियेशनमुळे त्वचा संबंधी किंवा प्रेगनेन्सी संबंधी काही समस्या निर्माण होऊ शकते. पण सावधानी बाळगणे उपचार घेण्यापेक्षा चांगले असते. सर्वात आधी हे पाहावे की, तुमची काम करण्याची जागा आरामदायी आहे का? तुमच्या कंप्यूटरच्या मॉनिटरला अश्या ठिकाणी ठेवा की तुमचे डोळे आणि त्याच्या मध्ये अर्ध्या हाताचे अंतर असेल. की-बोर्ड ऑपरेटर असा हवा की की-बोर्ड उपयोग करतांना ज्यामध्ये मनगटला आराम देईल असे पॅड लागलेले हवे. माउसला अश्या जागी ठेवा जिथे तुम्ही आरामात हात ठेऊ शकाल आणि हात आणि खांद्यांना काही समस्या येणार नाही. आपल्या बसायच्या पद्धतीवर लक्ष दयावे एकाचा जागेवर जास्त वेळ बसू नका. स्क्रीनला डोळे मोठे करून पाहणे हे नुकसानदायक असते. यामुळे तुम्ही कम्प्यूटर विजन सिंड्रोमने ग्रस्त होऊ शकतात. प्रयत्न करा की एक एक तासाने ब्रेक घ्याल. अश्या छोट्या छोट्या सावधानी बाळगल्यावर आपण नको असलेले दुखणे आणि थकवा यांपासून मुक्ती मिळवू शकतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री झोप येत नाही का? झोपण्यापूर्वी करा हे काम