Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणून घ्या, ऑफिसमध्ये खाण्याची योग्य पद्धत

Webdunia
कार्यस्थळावर अयोग्य प्रकारे खाण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला अनेक दुष्परिणाम भुगतावे लागू शकतात. एका हातात पेन पकडून सँडविच खाणारे लोक अधिकश्या लंचच्या महत्त्वाला दुर्लक्ष करतात. आपण कसं आणि काय खात आहात हे महत्त्वाचे आहे. खाताना सरळ बसणे आणि हळू- हळू चावून खाणे आवश्यक आहे. जाणून घ्या विशेष टिप्स-
जेवण चावून खा: कोणताही पदार्थ खाताना त्याचे पोषक तत्त्व पूर्णपणे शरीरात विरघळून जाण्यासाठी ते चावून- चावून खाणे आवश्‍यक आहे. घाईत आहार सेवन केल्याने जेवण पचण्यात पचन प्रणालीला खूप मेहनत घ्यावी लागते. अशात शरीराला सर्व आहाराचा लाभ मिळत नाही.

घाईत खाऊ नका: लंच टाइम कमी वेळाचा असल्यास योग्य खाद्य पदार्थ निवडा. आपण अधिकश्या फास्ट किंवा प्रोसेस्ड फूडवर निर्भर राहतात. या प्रकाराचे पदार्थ चरबी आणि शुगर वाढवतात. असे पदार्थ खाण्याने इंस्टंट एनर्जी वाटत असली तरी नंतर थकवा जाणवतो.
लंच ब्रेक आवश्यक आहे: बिझी शेड्यूल असला तरी जेवण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. या दरम्यान शरीरातून कॅल्सिटोनिन किंवा सीसीके रिलीज होतं. हा हार्मोन मेंदूला पोट भरण्याचे संकेत देतं पण आपण घाईत जेवत असाल तर मेंदूला तृप्ती जाणवणार नाही. यामुळे आपण अधिक सेवन कराल आणि लठ्ठपणा वाढण्यासह अनेक समस्यांना समोरा जावं लागेल.

काय करावे, काय नाही
1. कॅलरी ड्रिंक टाळा: हेल्थ ज्यूस ड्रिंक्स मध्ये शुगर अधिक मात्रेत असतं. याऐवजी पाणी प्यावे किंवा नैसर्गिक ड्रिंक्स प्यावे.
 
2. टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर खाणे टाळा: रिसर्चप्रमाणे स्क्रीनसमोर बसून खाण्याने आपण अधिक कॅलरी ग्रहण करतात. जेवताना आपण प्रत्येक घास तोंडात टाकताना जेवण्याकडे लक्ष द्या. लंचसाठी कमीत कमी 20 मिनिट काढा.
3. पोषक स्नॅक्स सेवन करा: नाश्ता आणि लंच यादरम्यान काही पोषक पदार्थांचे सेवन करावे. बदाम किंवा सफरचंद सेवन करू शकता.
 
4. कॉफी पिणे कमी करा: कॅफीनची अधिक मात्रा आपल्या शरीरात स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल रिलीज व्हायला लागतं. ज्यानंतर गोड खाण्याची इच्छा होते. दिवसातून एक किंवा दोन कपापेक्षा अधिक कॉफी सेवन करणे टाळा. त्याऐवजी ग्रीन टी प्या. याने आपले मेटाबॉलिझम वाढेल आणि शरीराला भरपूर अॅटीऑक्सीडेंट प्राप्त होईल.
 
5. जेवताना पाणी पिणे टाळा: पाणी जेवण्यापूर्वी किंवा नंतर प्यायला हवे. जेवताना पाणी पिण्याने पचन प्रणालीवर विपरित परिणाम होतो.

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

पुढील लेख
Show comments