Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रणयक्रीडेचे काही नियम

संदीप पारोळेकर
NDND

* दिवसा समागम करू नये. समागम (मैथुन) नेहमी रात्री केले पाहिजे आणि ते ही केवळ एकदाच.

* सूर्योदयाआधी व सूर्योदयानंतर काही ब्रम्ह मुहूर्त असतो. या काळात केलेले समागम आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतो.

* झोपण्याआधी दूध घेऊ नका, जर दूध घ्याचेच झाले तर झोपण्‍याच्या एक तास अगोदर घ्या.

* आपल्या पत्‍नीच्या मासिक धर्माच्या काळात तिच्यासोबत समागम टाळावा. निरोधचा (कंडोम) उपयोग करून ही समागम करू नका. मासिक धर्माच्या काळात केलेल्या समागमामुळे अनेक रोगाना सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ शकते. अनैसर्गिक मैथुनाला बळी पडू नका. या काळात संयम हाच एकमेव उपाय आह े.
NDND

* काही नागरिक समागमाकडे औपचारिकता दृष्टीने पहात असतात. केवळ वीर्य स्खलन झाले म्हणजे प्रणयक्रिडा थांबवून टाकतात. घाईत केलेल्या समागमाने आपले ही समाधान होत नाही तसेच आपला जोडीदाराही संतुष्ट होणार नाही. समागमाच्या आधी पुरेसा प्रणय करणं गरजेचे असते. मात्र हे अनेक जोडप्याना माहितच नसते. समागमापूर्वी प्रणय केल्यामुळे दोघांमध्ये सुखद संवेदना जागृत होऊन पुरुषाचे शिश्न ताठर व स्त्रीच्या योनीमध्ये ओलावा निर्माण होतो. दोघांमध्ये समाधानकारक समागम होण्यासाठी या गोष्टी फारच महत्त्वाच्या असतात. समागमा अगोदर साधारण 15 ते 20 मिनिटे प्रणय करावा.

* समागम कधीच एकतर्फी होऊ शकत नाही. त्यासाठी पती- पत्‍नीमध्ये समन्वय असायला पाहिजे. जर आपला जोडीदार थकला असेल किंवा त्याच्या मनात भिती निर्माण झाली असेल तर त्याच्यावर कुठल्याच प्रकारची जोरजबरजस्ती करणे योग्य नाही. दोघेही एकरूप झाल्याशिवाय समागमाचे समाधान होत नाही.

* समागमात आसनाचे खूप महत्व आहे. परंतु आसनांचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक असते.
NDND


* समागम झाल्या झाल्या ढसाढसा पाणी पिऊ नये. समागम झाल्यानंतर पती- पत्‍नीने मिष्ठान्न खाल्ले पाहिजे. व त्यानंतर साधारण अर्ध्या तासानंतर पाणी ग्रहण करणे, दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते.

* संभोगानंतर लिंग थंड पाण्याने न धुता त्याला स्वच्छ कापडाने पुसले पाहिजे.

* संभोग झाल्यानंतर लगेच हवेत फिरायला निघणे दोघांच्या दृष्टीने हानिकारक होत असते.

* आपल्या वयापेक्षा अति मोठ्या किंवा अत‍ि लहान व्यक्तीशी संभोग करू नये. तसेच एका पेक्षा जास्त व्यक्तिशी संभोग करणे, आपल्या संस्कृतीच्या विरूध्द आह े.

* समागम करण्‍यापूर्वी काही नागरिकामध्ये न्यूनगंड निर्माण होत असतो. त्यामुळे बाजारात आलेल्या शक्तिवर्धक औषधीचे ते सेवन करत असतात. अशा औषधीचे अतिसेवन केल्याने आपली नैसर्गिक शक्ति लोप पावत असते. न्यूनगंड निर्माण झाल्यास डॉक्टराचा सल्ला घ्या.

अशा काही नियमाचे पालन केल्याने आपण आपल्या जोडीदारासोबत समागमाचा परमोच्च आनंद घेऊन आपल्या क्षमतेत वृध्दी करू शकता.

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात