Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वजन कमी करण्याचे उपाय

Webdunia
कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. 
 
योग्य राहणीमान, योग्य मात्रेतील योग्य वेळी घेतला जाणारा सर्वसमावेशक आहार व आहार सिध्दांताचा अवलंब केला तर मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण निश्चित कमी होऊ शकते. एखाद्या वादळाप्रमाणे झपाट्याने वाढत चाललेले मधुमेह, रक्तदाब, वाढते वजन, हृदयविकारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ताबडतोब उपाययोजना करण्याची आणीबाणीची वेळ येऊन ठेपलेली आहे. 
 
वाढत चाललेल्या वजनाची मुळेही आईच्या गर्भावस्थेच्या काळापासून असू शकतात. गर्भावस्थेतील अतिमात्रेतील, अतिपौष्टिक आहारदेखील जन्मानंतरच्या वाढलेल्या वजनास कारणीभूत ठरत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पध्दतीने जन्मणा-या बाळास भविष्यात काय आजार होऊ शकतात हे एक चाणाक्ष आई-वडिलांची प्रकृती बघून एका क्षणात सांगू शकतो. 
 
वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा, व्यायामात सतत बदल करा, एकाच प्रकारचा व्यायाम काही काळानंतर फायदेशीर ठरत नाही. 
 
शरीरातील आळस, सुस्ती झटकून सतत क्रियाशील राहण्याचा प्रयत्न करावा. अनुवंशिकतेने वजन वाढले आहे म्हणून स्वत:ला दोष देऊ नका. 
 
कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट करू नका. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. 
 
किती खातोय यापेक्षा काय खातो आहे याकडे लक्ष द्या. दररोज एकच एक पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. लक्षात घ्या नियमित जेवणाऐवजी आठवड्यातून दोन वेळा फळे, दोन वेळा कोशिंबीर, दोन वेळा कडधान्ये, दोन वेळा फळांचा रस, दोन वेळा पालेभाज्यांचा रस किंवा सूप घेण्याचा प्रयत्न करावा. आपली आरोग्य तपासणी नियमित करावी. 

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments