Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुजलेल्या पायांवर पाच उपाय

Webdunia
मंगळवार, 18 नोव्हेंबर 2014 (00:02 IST)
काही वेळा लोकांचे पाय सुजतात. त्याला वैद्यकीय शास्त्रात एडिमा असे म्हणतात. साधारणत: लघवीचे विकार असणार्‍यांचे पाय सुजतात असे मानले जाते. मात्र पाय सुजणे हे मधुमेहाचे सुद्धा लक्षण असू शकते. आपली पावले हा शरीराचा खालचा भाग आहे आणि या भागापासून रक्त वर वाहण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात काम व्हावे लागते. तसे ते झाले नाही की, पायाकडचा रक्त पुरवठा जास्त होतो आणि पाय सुजतात.
 
साधारणपणे घोटे आणि तळवे सुजतात. अर्थात पावले सुजण्याची अनेक कारणे आहेत. महिलांच्या बाबतीत गरोदर अवस्थेत पावले सुजतात. 
 
रक्तदाबाने सुद्धा पावले सुजू शकतात. अशा पाय सुजण्यावर खालीलप्रकारचे पाच उपाय करावेत. ते सर्व घरगुती उपचार आहेत.
 
१) एका बकेटात पाणी घेऊन त्या पाण्यात पेपरमींट ऑईल अगदी थोड्या प्रमाणात टाकावे. युकॅलिप्टस्चा सुद्धा वापर होऊ शकतो. अशा पाण्यात आपले पाय बुडवून ठेवावे. मोठा दिलासा मिळू शकेल. 
 
२) रक्त गोठल्यामुळे किंवा त्याचा प्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजले असतील तर मालीश करावे.
 
३) अशाच रितीने मिठाच्या पाण्यात सुद्धा पाय बुडवून ठेवता येतात. त्यानेही सूज कमी होते. 
 
४) उताणे झोपावे आणि आपले पाय एका उशीवर उंच ठेवावेत. त्याने रक्तप्रवाह उलट्या दिशेने सुरू होतो. खुर्चीवर बसून टेबलावर काम करण्याची सवय असेल तर पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे. 
 
५) भरपूर पाणी प्यावे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

फ्रिझी आणि कुरळे केस मऊ करण्यासाठी हे 3 हेअर मास्क वापरा

Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही

Vaginal Ring अवांछित गर्भधारणेपासून टाळण्यासाठी वेजाइनल रिंग !

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

Show comments