Dharma Sangrah

रोगप्रतिकार शक्ती वाढवते आवळा पेय

Webdunia
सोमवार, 10 मे 2021 (22:27 IST)
आवळा नियमितपणे घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आवळा व्हिटॅमिन सी गुणधर्मांने समृद्ध आहे, आवळा आरोग्याशी संबंधित अनेक आजारांशी लढायला मदत करत.  आवळा खाल्ल्याने  किंवा याचा रस घेतल्याने आपल्याला व्हिटॅमिन सी सह झिंक, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स इ. मिळतात. तसेच दर रोज आवळा  खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी देखील आवळा पेय उत्तम आहे. 
 
कसं बनवावे जाणून घ्या -
साहित्य -
2 चिरलेले आवळे, 1 चमचा आल्याचा रस, पुदिना पाने,1/4 चमचा काळी मिरपूड, थोडंसं चाट मसाला,1 कप कोमट पाणी. 
 
कृती - 
आवळा रस तयार करण्यासाठी चिरलेला आवळा, आल्याचा रस, पुदीना पाने आणि कोमट पाणी मिसळा.हे सर्व ब्लेंडर मध्ये वाटून घ्या. एका ग्लासात ओतून घ्या. वरून काळीमिरपूड, आणि चाट मसाला मिसळा तयार आहे उत्कृष्ट आवळा पेय. हे प्या आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवा.
 
चला जाणून घेऊया आवळा खाण्याचे काय फायदे आहे- 
 
1. आवळा खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांची पातळीत सुधारणा होते. जर  वजन कमी करायचं असेल तर. आवळा त्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 
2 आलं शरीराच्या प्रतिकारक शक्तीला वाढवते. त्याबरोबरच सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन सारख्या आजारांची शक्यता कमी होते.
 
3 आवळा रसचे  नियमित सेवन केल्यास पोटाच्या अनेक समस्यां पासून मुक्तता मिळते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर  या समस्येपासून मुक्तता मिळते.
 
4. गॅसची समस्या असल्यास आवळा रस प्यावे. ऍसिडिटीची समस्या असल्यास आवळा रस आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे.
 
5. डोळ्याच्या समस्यांसाठी आवळ्याचा रस फायदेशीर आहे. यामुळे डोळ्याची दृष्टी वाढते. जर डोळ्यांमध्ये नेहमी खाज येत सेल तर आवळा  रस घ्या . हा त्रास नाहीसा होईल. 
 
6. रोज सकाळी अनोश्या पोटी एक ग्लास पाण्यात आवळाचा रस मिसळून प्या. हे शरीरात उपस्थित सर्व विषारी द्रव्ये काढून टाकेल.
 
7आल्यामध्ये असे घटक असतात जे कर्करोगासारख्या आजारांविरूद्ध लढण्यासाठी प्रभावी असतात. म्हणूनच, हे  कर्करोग होण्याचा धोका कमी करण्यात मदत करतात.
 
8. आवळा खाल्ल्याने रक्त साफ होते. तसेच अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे ते आपल्या त्वचेला चमक देखील मिळते.
 
9 जर  घशात सूज आल्याचा त्रासाने ने त्रस्त आहात. तर पुदीनाचे सेवन आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Chaat Recipes Without Oil तेलाशिवाय बनवा स्वादिष्ट चाट

गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या गोष्टींची काळजी घ्या

बीबीए अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर बनवा

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

पुढील लेख
Show comments