Dharma Sangrah

हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांनी ही खबरदारी घ्यावी अन्यथा समस्या वाढू शकते

Webdunia
शनिवार, 12 डिसेंबर 2020 (19:11 IST)
हिवाळ्याचे थंड हवामान बऱ्याच लोकांना आवडतं.परंतु काही लोकांसाठी हे हवामान नुकसानदायी असत. विशेषतः दम्याच्या रुग्णांसाठी हे हवामान खूप वेदनादायक असतो. खरं तर दम्याच्या रुग्णांच्या वायुमार्गात आधीच सूज आलेली असते. जी हिवाळ्यात वाढते. या मुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. यंदाच्या वर्षी तसेच तर कोरोना साथीचा रोग पसरला आहे, अशा मध्ये दम्याच्या रुग्णांनी अत्यंत जागरूक असणे महत्त्वाचे आहे आणि तशीच काही सावधगिरी देखील बाळगायची असते नाही तर त्यांचे त्रास वाढू देखील शकतात.
* शक्य असल्यास घरातच राहा-
दम्याच्या रुग्णांनी शक्य तितके घरातच राहावे. जर बाहेर पडत असाल तर जातांना मास्क आवर्जून लावावे. रस्त्यावर उडणारे धूळयुक्त मातीचे कण श्वास घेण्यास त्रास देऊ शकतात. जर आपण मास्क लावलं तर कोरोनापासून देखील सुरक्षित राहाल.
* पाण्याची कमतरता होऊ देऊ नका -
बहुतेकदा लोक हिवाळ्यात पाणी कमीच पितात, परंतु हे दम्याच्या रुग्णांसाठी धोकादायक असू शकत. पुरेसे पाणी प्यायल्यानं  फुफ्फुसांमधील कफ किंवा श्लेष्मा पातळ होतो, जेणे करून तो शरीरातून सहजपणे बाहेर पडतो. वास्तविक श्लेष्मा किंवा कफ दम्याच्या रुग्णांची श्वासाशी निगडित त्रास वाढवतात.
* घराला स्वच्छ ठेवा -
 दम्याच्या रुग्णांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. घर स्वच्छ ठेवण्या शिवाय जिथे आपण झोपता, तिथली चादर आणि ब्लँकेट दर आठवड्याला गरम पाण्याने धुवावे, कारण घाणीमुळे ऍलर्जी ची समस्या उद्भवू शकते आणि त्यामुळे दमा वाढू शकतो.
* तंबाखू किंवा धूम्रपानापासून दूर राहा -
 दम्याच्या रुग्णांना तंबाखू किंवा धूम्रपानापासून दूरच राहावे, कारण हे केवळ दम्याचे त्रासच वाढवत नाही तर इतर गंभीर आजार देखील होऊ शकतात. या रुग्णांना वारंवार हात धुणे आवश्यक आहे जेणे करून त्यांच्या शरीरात कोणतेही व्हायरस प्रवेश करू नये आणि दम्याचा त्रास वाढू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

पिंपल्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Jewelry Storage Tips ज्वेलरी योग्य पद्धतीने कशी ठेवावी?

रविवार स्पेशल बनवा हेल्दी, चविष्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज

हृदयासाठी काळे तीळ फायदेशीर आहे, इतर फायदे जाणून घ्या

Career in B.Sc in Anesthesia : बीएससी इन ऍनेस्थेसिया कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments