Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तम झोपेसाठी या तीन वस्तू

उत्तम झोपेसाठी या तीन वस्तू
दिवसभर काम आणि थकवा आल्यावर प्रत्येकाला रात्री गाढ झोप हवी असते. जर तुम्हालाही चांगली झोप हवी असेल तर या गोष्टींकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे की झोपण्या अगोदर कोणत्या वस्तूंचे सेवन केले पाहिेजे आणि कोणते नाही. आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थांबद्दल सांगत आहो ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि काही वस्तूंचे सेवन केल्याने तुमची झोप उडू शकते.
 
या पदार्थांमुळे येते चांगली झोप
1) चेरी- चेरी त्या नॅचरल वस्तूंमधून एक आहे ज्यात मेलाटोनिन केमिकल असतो. हे केमिकल तुमच्या बॉडीतील इंटर्नल क्लॉकला कंट्रोल करतो आणि तुम्हाला चांगली झोप देण्यास मदत करतो.  
 
2) दूध- दुधात अमीनो ऍसिड ट्रिप्टोफॅन असतो जो मेंदूत रासायनिक सेरोटोनिनचा अग्रदूत असतो. 
 
3) जास्मिन राईस- यात भरपूर प्रमाणात ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्याचा अर्थ असा आहे की शरीर हळू हळू पचन करून हळू हळू रक्तात ग्लूकोज निर्माण करतो.
 
 
या पदार्थांच्या सेवनापासून दूर राहा
 
1) वाइन- दारू तुमच्या सिस्टममध्ये लवकर मेटाबोलाइझ होते आणि अस्वस्थतेचे कारण बनते. झोपण्याअगोदर दारूचे सेवन नाही केले पाहिजे.  
 
2) कॉफी- यात कॅफीन असत जे सेंट्रल नर्व्हसला उत्तेजित करते. झोपताना कॉफीचे सेवन करणे टाळावे.
 
3) डार्क चॉकलेट- चॉकलेटमध्ये फक्त कॅलरीजच नव्हे तर कॅफीन देखील असत. उदाहरणासाठी, 1.55 औंस हर्शे मिल्क चॉकलेटमध्ये किमान 12 मिलीग्राम कॅफीन असतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दाट आणि काळ्या केसांसाठी आवळा हेअर मास्क