Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Health Tips : उशी न घेता झोपल्याचे आरोग्यदायक फायदे जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 3 जून 2020 (07:27 IST)
आपल्याला वर्षानुवर्षे उशी घेऊन झोपण्याची सवय आहे आणि आपण विचार करीत आहात की उशी न घेता झोपल्याने मानदुखीचा त्रास होऊ शकतो. तर आपण चुकीचा विचार करीत आहात. उशी न घेता झोपल्याने आपल्याला अनेक प्रकारे शारीरिक आणि मानसिक फायदे होऊ शकतात. आपण अनभिज्ञ असल्यास जाणून घ्या उशी घेतल्याशिवाय झोपण्याचे 5 फायदे.
 
1 जर आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवतात तर उशी न वापरता झोपावे. वास्तवात हा त्रास पाठीच्या कणेमुळे उद्भवतो. ज्याचे कारण आपली झोपण्याची चुकीची सवय आहे. उशी न घेता झोपण्याच्या सवयीमुळे आपला पाठीचा कणा सरळ राहतो आणि आपला हा त्रास कमी होईल.
 
2 साधारणपणे आपल्या मानेमध्ये आणि खांद्यांमध्ये वेदना व्यतिरिक्त मागील बाजूस त्रास आपल्या उशी घेण्याचा सवयीमुळे होतो. उशी न घेता झोपल्याने या अवयवांमध्ये रक्त परिसंचरण चांगले होईल आणि वेदनेपासून सुटका होईल.
 
3 कधी कधी चुकीच्या पद्धतीने उशीचा वापर केल्याने आपल्या मानसिक त्रास देखील उदभवू शकतात. उशी कडक असल्यास आपल्या मेंदूवर अनावश्यक तणाव येऊ शकतो. ज्यामुळे मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते.
 
4 तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उशी घेतल्याशिवाय झोपणे आपल्याला शांत झोप घेण्यास मदत करते. आपण चांगली झोप घेऊ शकता. ज्याचं आपल्या मनावर आणि आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो.
 
5 जर आपल्याला सवय आहे उशीमध्ये तोंड घालून झोपण्याची. तर या  सवयीमुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. या व्यतिरिक्त ही सवय आपल्या चेहऱ्यावर  तासंतास दाब बनवून ठेवते. ज्यामुळे रक्त परिसंचरणवर प्रभाव पडतो आणि चेहऱ्याच्या समस्या उद्भवतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

शिर्षासन करण्याची पद्धत आणि 7 फायदे जाणून घ्या

लघू कथा : बेडूक आणि उंदराची गोष्ट

Old Delhi famous recipe : आता घरीच बनवा मटण निहारी

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

केसांना मेंदी लावण्याचे 5 सौंदर्यवर्धक फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments