आपण स्तन कर्करोगाला बळी नसल्याची तपासणी घरी देखील करू शकता. कर्क रोग हा वेगाने पसरणारा आजार असल्यामुळे वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. महिला सर्वात जास्त प्रमाणात स्तनाच्या कर्करोगाने ग्रसित असतात. अश्या परिस्थितीत स्तनांची नियमित तपासणी केल्याने सुरुवातीस कर्करोगाचा शोध लावता येऊ शकतो आणि त्याला प्राणघातक होण्यापासून बचाव करू शकतो.
डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आणि तपासणी करण्यापूर्वी आपण स्वतः आपल्या स्तनाची तपासणी करून प्रारंभिक लक्षणे ओळखू शकता. स्तन कसे तपासायचे हे जाणून घ्या, काही चरणां मध्ये.
1 आरशासमोर उभे राहा
आरशासमोर उभे राहून खोलीत भरपूर प्रकाशात येत असल्यास आपले खांदे सरळ ठेवा, हातांना सैल सोडा, आणि स्तनाच्या आकारात काही फरक आहे का बघा, किंवा कोणती ही विकृतीची तपासणी करा.
2 स्तनाग्रांची तपासणी
स्तनानंतर, स्तनाग्रांची तपासणी करा. त्यात कुठल्याही प्रकारचे डाग असल्यास किंवा त्यांच्या रंगात अंतर आहे का बघा. नंतर स्तनाग्रांना दाबून बघा. द्रवस्त्राव होत तर नाहीये याची तपासणी करा.
3 काखेची तपासणी
स्तनांच्या कर्करोगासाठी केवळ स्तनच नाही तर काखेचीही तपासणी आवश्यक आहे. यासाठी आपला हात वर करा आणि आपल्या काखांचे परीक्षण करा. काखेत बोट फिरवा आणि तेथे कुठली गाठ तर नाही हे तपासा. दोन्ही काख पूर्णपणे तपासा.
4 स्तनांच्या ऊतकांची तपासणी
आपल्या स्तनाच्या ऊतकांना हळुवार दाबा आणि काखेच्या भागापासून स्तनापर्यंत प्रत्येक ऊतक नीट तपासून पहा की त्यात कोणत्याही प्रकाराची गाठ किंवा इतर काही समस्या तर नाहीत.
5 मासिक पाळीच्या 3-5 दिवसांनंतर तपासा
मासिक पाळीच्या 3 ते 5 दिवसांनंतर स्तन तपासणीसाठी सर्वोत्तम काळ असतो. ह्याचे कारण असे आहे की मासिक पाळीच्या 5 दिवसांनंतर स्तनांवर सूज नसते आणि त्यांचे परीक्षण करणे सोपे जाते.
दरमहा स्वत: साठी 10 मिनिटे घ्या आणि आपल्या स्तनाची तपासणी करा. आपण नियमितपणे स्तनाचे परीक्षण करणे सुरू करा आणि काहीही विचित्र आढळल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नका.