Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मास्क वापरताना या 10चुका करू नका

Don't make these 10 mistakes when using a mask arogya tips in marathi
, शुक्रवार, 14 मे 2021 (16:49 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. या विषाणूला टाळण्यासाठी सध्याच्या काळात मास्कचा वापर,सामाजिक अंतर राखणे, हात धुणे,सर्वात प्रभावी उपाय आहे. लसीकरण देखील केले जात आहे. लसीकरण केल्यावर देखील कोविडच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क लावताना लोक काही चुका करत आहे या कारणामुळे देखील ते या आजाराच्या वेळख्यात अडकत आहे. चला डबल मास्क लावण्याची योग्य पद्धत आणि मास्क वापरताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेऊ या. 
 
1 मास्क तोंडावरून घसरत असल्यास दोन्ही बाजूने वर करावे. काही लोक तोंडावरून वर सरकवतात. असं करू नये. 
 
2 बाहेरून आल्यावर मास्क कुठे ही ठेवतात असं करू नये. मास्क एका जागी लावून ठेवा किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवा.
 
3 डबल मास्क शरीरात हवेला प्रवेश करण्या पासून रोखते.सीडीसीच्या मते, सर्जिकल मास्क कफाच्या कणांना 56.1 टक्के रोखते. आणि कापडी मास्क 51.4 टक्के प्रभावी आहे.  
 
4 कधीही सर्जिकल मास्क किंवा कापडी मास्क एकत्र लावू नये. या ऐवजी आपण एक सर्जिकल आणि एक कापडी मास्क लावा. सीडीसीच्या मते,संसर्ग होण्याचा धोका सुमारे 85 टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो. 
 
5 डबल मास्क वापरताना श्वास घेण्यास आरामदायक वाटले पाहिजे.
 
6 मास्क फाटलेला असल्यास त्याला अजिबात वापरू नका.
 
7 मास्क घालताना लक्षात ठेवा की हवेचा प्रवाह चांगला असलायला पाहिजे. आरामात श्वास घेता आले पाहिजे.जर श्वास घ्यायला त्रास होत असल्यास हे शरीरासाठी हानिकारक आहे. 
 
8 बाहेर जाण्यापूर्वी घरातच मास्क घालून फिरवून घ्या, जेणे करून आपण त्यामध्ये स्थितीमध्ये सहज होऊ शकाल.
 
9 डिस्पोजल मास्क एकदाच वापरा  आणि त्याला टाकून द्या. 
 
10 कापडी मास्क लावत असाल तर ते स्वतंत्रपणे धुवावे. सर्व कपड्यांसह धुवू नये. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाच्या उपचारात स्टिरॉइडचा चुकीचा वापर केल्याने मानसिक संतुलन बिघडतंय: मानसोपचारतज्ज्ञ