Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांगली झोप येण्यासाठी दुधात तूप मिसळून प्या

चांगली झोप येण्यासाठी दुधात तूप मिसळून प्या
, शनिवार, 15 मे 2021 (08:15 IST)
निरोगी राहण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच बर्‍याच लोकांना रात्री 11 पर्यंत झोपणे आणि सकाळी वेळीच उठणे आवडते.या मुळे दिवसभर ताजेपणा राहतो आणि मेंदू देखील हलकं राहतो. कधी -कधी तणावामुळे जास्त थकवा आल्यामुळे निद्रानाशाची समस्या सुरु होते. या मुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. कोणत्याही कामात मन लागत नाही, आळशीपणा जाणवणे,डोकेदुखी,दिवसभर झोप न येणं.या सारख्या समस्या उद्भवू लागतात. या पासून मुक्तता साठी दररोज दुधात तूप घालून प्यावे.चला तर मग याचे फायदे जाणून घ्या.
 
1 निद्रानाश ची समस्या- निद्रानाशाची समस्या असल्यास दररोज दुधात तूप घालून प्यावे. असं केल्याने मेंदूच्या नसा शांत होतात आणि शांत झोप लागते.
 
2 चमकणारी त्वचा- दुधात आणि तुपात नैसर्गिक मॉइश्चरायझर असते. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चकाकी येते. हे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यात मदत करते.
 
3 सांधेदुखी पासून आराम -आजच्या काळात सांधेदुखी होणं देखील खूप सामान्य झाले आहे. या वर अद्याप काहीही प्रभावी उपाय सापडला नाही. इतर औषधांसह दूध तुपाचे सेवन करू शकता. तुपामधील आढळणारे के 2 दुधातील कॅल्शियम सामग्री शोषण्यात मदत करते.या मुळे सांधे दुखण्यात आराम मिळेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कच्च्या कैरीचे लोणचे