Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कच्ची पपई खाल्ल्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

कच्ची पपई खाल्ल्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (15:59 IST)
पपईच्या पोषणामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक आरोग्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. पण जर तुम्ही कच्च्या पपईचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते आरोग्याला हानी देखील होऊ शकते.
 
चला जाणून घेऊ या की कच्च्या पपईतील कोणत्या गोष्टी शरीराला हानी पोहोचवू शकतात तसेच कोणी कच्ची पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा- 
 
साधारणपणे गर्भवती महिलांना कच्ची पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो. यात पॅपेन नावाचा पदार्थ असतो जो प्रोटीओलाइटिक एन्झाइम असतो आणि याने गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. याने गर्भपाताचा धोका वाढतो.
 
कच्ची पपई योग्य प्रमाणात खाल्ल्यास पचनासाठी फायदेशीर ठरते पण अधिक सेवन केल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
 
कच्ची पपई खाल्ल्याने लूज मोशन, उलट्या आणि मळमळ अशी समस्या देखील उद्भवू शकते. जास्त प्रमाणात पपईचे सेवन केल्यास अन्ननलिकेचे नुकसान होऊ शकते.
 
कच्ची पपई जास्त प्रमाणात खाल्ल्याने दम्याच्या रुग्णांना त्रास होतो.
 
कच्च्या पपईमुळे अनेक वेळा ऍलर्जी होऊ शकते. याने पोट फुगणे, डोकेदुखी, पुरळ उठणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशात डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ताप : लास्सा ताप काय आहे? तो कसा पसरतो?